आशिया चषक स्पर्धेला आजपासून युएईमध्ये सुरुवात होता आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या प्रमुख संघांमध्येच खरी स्पर्धा रंगणार आहे. या चार संघांव्यतिरिक्त या स्पर्धेत अफगाणिस्तान व हॉंगकॉंग या संघांचा समावेश करण्यात आला आहे. यातील हॉंगकॉंगच्या संघाला अद्याप एकदिवसीय संघाचा दर्जा मिळालेला नसून केवळ या मालिकेपुरता त्याला हा दर्जा देण्यात आलेला आहे.पहिला सामना १५ सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात होईल.
या स्पर्धेच्या पूर्व संध्येला काल पत्रकार परिषद झाली. त्यात सर्व सहा संघाचे कर्णधार हजर होते. त्यावेळी भारतीचा प्रभारी काकर्णधार रोहित शर्मा ला प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्याने तो म्हणाला, भारत येथे खेळणार असल्याने आम्ही खुश आहोत. आमच्या संघातील काही प्रमुख खेळाडू येथे आलेले नाहीत तरी आम्हाला संघ म्हणून काई करायचे आहे ते माहिती आहे. मागील काही मर्यादित षटकांच्या मालिकांमध्ये आमच्या संघाची कामगिरी उत्तम राहिली असून या स्पर्धेतही आम्ही तयारीनीशी उतरत आहोत.
“एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करून खेळ करणे यावर आमचा भर राहील. या स्पर्धेतील अन्य संघदेखील तुल्यबळ आहेत. त्यांचेही लक्ष्य ही स्पर्धा जिंक्याचे असेल. त्यामुळे ही स्पर्धा खूप अटातटीची होईल.”
पाकिस्तान विषयी प्रश्न विचारल्यावर रोहित म्हणाला, पाकिस्तानचा संघ तगडा आहे. मागील काही मालिकेतील त्याची कामगिरीही चांगली आहे. त्याच्या विरुद्ध खेळणे नेहमी रोमांचकारी असते. परंतु, ही स्पर्धा जिंकायची असेल तर अन्य संघावर देखील नजर ठेवावी लागेल.
अधिक वाचा : अर्जुन तेंडुलकर ची मुंबईच्या संघात निवड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola