अकोट (प्रतिनिधी) : अकोट येथील स्थानिक वसुंधरा ज्ञानपीठ शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत पडून राहणारे रिकामी पिंप योग्य प्रकारे उपयोगात आणून त्यापासून कचरापेटी तयार केली आहे एखादी संकल्पना मनात शिरणे व त्याला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळाल्यावर अनेक चांगल्या गोष्टी साकारल्या जाऊ शकतात त्याचे मूर्तिमंत उदाहरण वर्ग ५ च्या विद्यार्थ्यांनी घालून दिले आहे . विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने शाळेतील तेलाच्या रिकाम्या पिंपात हिरवे रंग भरले ,त्यावर स्वच्छतेचे संदेश लिहून आता स्वच्छता पेटी म्हणून उपयोगात आणल्या जात आहेत स्वच्छ भारत मिशन अंतर्गत या सर्व पेट्या प्रत्येक वर्गात ठेवण्यात आल्या असून त्यामध्ये विद्यार्थी कचरा टाकत आहेत. या नावीन्यपूर्ण उपक्रम कल्पना साकार करणाऱ्या वर्ग ५ च्या विद्यार्थी कुमारी शर्वरी दातीर , जानवी ढवळे, सार्थकी मगर आणि समृद्धी लांडे , कृष्णा लीलांडे ,समृद्धी साबळे, कार्तिक सांगळे, विश्वास सार्थक बिहाडे ,कृष्णा पंडे, आयुष कुकडे, वेदांत काळे ,कृष्णा रावणकार यांचे मुख्य अध्यापक शिवचरण नारे यांनी कौतुक व गौरव केला आहे.
अधिक वाचा : अकोट मध्ये जेसीआयच्या वतीने ट्रॅक्टराचा अनोखा फॅशन शो!!
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola