मुंबई : गगनाला भिडलेल्या इंधन दरवाढीनंतर आता राज्य वीज नियामक आयोगाने राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा “शाॅक” दिला आहे.मात्र २०१८-१९ या वर्षासाठी दक्षिण मुंबईतील बेस्टच्या विजेचे दर ६ ते ८ टक्क्यांनी कमी करून दक्षिण मुंबईतील जनतेला दिलासा दिला आहे.ही दरवाढ १ सप्टेंबर २०१८ पासून नवीन दर लागू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने २०१८ -२०२० या कालावधीतील राज्यातील घरगुती, कृषी व औद्योगिक विजचे नवीन दर जाहीर केले आहेत. हे दर १ सप्टेंबर पासून लागू झाले असल्याची माहिती वीज नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कृषी क्षेत्राचे वीजदर ३ रुपये ३५ पैशांवरून ३ रुपये ५५ पैसे प्रती युनिट करण्यात आले आहे. तर घरगुती वीज ग्राहकांचे ० ते १०० युनिटसाठी ५ रु. ०७ पैशावरून ५ रु. ३१ पैसे तर १०१ ते ३०० युनिटसाठी ८.७४ रु. वरून ८.९५ रुपये प्रती युनिट असा नवीन दर जाहीर करण्यात आला आहे.
एकीकडे राज्यातील जनतेला वीजदर वाढ केली असतानाचा २०१८-१९ साठी दक्षिण मुंबईतील बेस्टच्या विजेचे दर ६ ते ८ टक्क्यांनी कमी करण्यात येवून दक्षिण मुंबईतील जनतेला दिलासा दिला आहे. तर उत्तर मुंबईतील अदानी इलेक्ट्रिसीटी व टाटा पॉवरच्या वीजेच्या दरात ० ते १ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
अधिक वाचा : हिंदू सणांनाच लक्ष्य का करता, हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना झापले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola