अकोट(सारंग करालेे)- शहरात आजपर्यत जे.सी.आय च्या वतीने विविध अनोखे प्रयोग करुन सामिजीक जनजागुर्ती करण्याचे काम करत येत असुन आता अनोखा व नवीन प्रयोग म्हणजे टँक्टरचा फेशन शो आज दि.१२सप्टेंबर १८ रोजी अकोट शहरातील नदिपेंठ भागातील बिलबिले मगंल कार्यलयाच्या मैदानात आयोजित करण्यात आला होता. यांमधे अकोट शहरासह तालुक्यातील २५ टँक्टरने मोठ्या प्रमाणात भाग घेतला.शेतकऱ्यांचा शेतीपूरक आधुनिक मित्र म्हणजे ट्रॅक्टर आज पारंपरिक शेतीला ट्रॅक्टरची जोड देऊन शेतीची कामे जलद गतीने होत आहेत.
शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे असणारे फायदे ट्रॅक्टरचे महंत्व यासह आज ट्रॅक्टर मध्ये येणारी अत्यांधुनिक यंत्रप्रणाली याबाबत जनजागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने अकोटमध्ये जेसीआय च्या वतीने ट्रॅक्टरांच्या अनोखा फॅशन शो ठेवण्यात आला होता.
यावेळी टँक्टर ची सजावटी सह स्पर्धेत भाग घेतलेल्यानी आक्रर्षकअशी। वेशभुषा केली होतीत्यामुळे प्रेक्षकाच्या डोळ्याचे पारणे फेडले यावेळी सामाजिक जन जागुर्ती करीता पर्यावरण बचाव , जय जवान जय कीसान ,बेटी बचाव बेटी पढाओ ,व शेतीला जोडधंदा बाबत मार्गदर्शक फलक लावण्यात आले होते .
प्रत्येक ट्रॅक्टर हा स्पर्धेत कसा विजयी होईल या दृष्टीने विविध कलांकृती सादर करत होता ट्रॅक्टरांची मिरवणूक काढून ट्रॅक्टरांसाठी तयार केलेल्या रॅम्पवॉकवर ट्रॅक्टराना आणून परिक्षक
त्यांचे परिक्षण करून ट्रॅक्टरांना क्रमांक देण्यात आले होते. ट्रॅक्टरच्या माध्यमातून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करताना दिसला
यामध्ये सहभागी ट्रॅक्टरचे परीक्षण नगारा फेरी, जनजागृती फेरी ,एका चाकावर ट्रॅक्टर चालवणेयासह विविध पाच फेऱ्या घेऊन प्रेक्षकांनी दिलेल्या गुणांच्या आधारावर शेतकरी मोर्टर्स च्या वताने विविध रोख बक्षीसे देण्यात आली. या कार्यक्रमाला यशंस्वी करण्याकरीता जेसीआय च्या सर्व पदिधिकारी यांनी परीश्रम घेतले .
अधिक वाचा : देवरी येथे बैल पोळा उत्साहात साजरा उत्कृष्ट सजावट करणारे ८ बैलजोड़ी मालकांना दिली फ़ोटोची प्रतिमा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola