मुर्तीजापुर (प्रकाश श्रीवास) : जस जशी शहरातील लोकसंख्या वाढत असून तेवढयाच वेगाने रहदारी, वाहनांची संख्या वाढली आहे त्यामुळे अपघाचे प्रकार वाढतच चालले आहे. अशातच मूर्तीजापुरचे बसस्थानक हे अतिशय कमी जागेत असल्यामुळे वाहतुकीस अडचणी निर्माण होत आहे.
वाढती लोकसंख्या लक्षात घेता बसस्थानक हे आगारात स्थानांतरित करणे अतिशय गरजेचे झाले आहे. वाढत असलेली लहान मोठी शहरे यामुळे शहरे देखील प्रवाश्यासाठी डोकेदुखी झाली आहे. मूर्तीजापुर येथील बसस्थानक हे शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे जिवीत हाणीच्या दृष्टी कोणातुन बघता हलविणे काळाची गरज झाली आहे.
मूर्तीजापुर बसस्थानकाचे निर्माण दि.९ मे २००३ मध्ये झाले होते. तेव्हा शहराची लोकसंख्या अतिशयकमी होती. ग्रामीण भागातील५०% नागरिक शिक्षणासाठी शहरात स्थायिक झाले आहेत. शिवाय बसस्थानका लगत महामानव छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे असल्यामुळे बसस्थानक परीसरात दिवसभर नागरीकांची वर्दळ असते.
जवळच रेल्वे स्टेशन असुन प्रवाश्यांची रेलचेल सुरू राहते.एकदम अल्पशा जागेत बसस्थानक असल्यामुळे दोन वेळा परीसरात मोठे अपघात झालेआहेत.एका चालकाचा बस खाली येवून तर ग्रामीण भागातील एका म्हातारीचा बसच्या मागील चाकात येवून मुत्यु झाल्यायाच्या घटना घडल्या आहेत. नगर पालीका प्रशासनाने बसस्थानकाशेजीच मोठ मोठे शाँपिग काँम्प्लेकस निर्माण केल्यामुळे वाहतूक करतांना बस चालक आणि वाहन धारकांना कमालीचा त्रास होत आहे.
दिवसाकाठी बसस्थानकावर अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, बुलढाणा, कारंजा, दर्यापूर,आदी आगारातील३६० बसेस येणेजाणे करतात जागेची महत्ता लक्षात घेऊन महामंडळ प्रशासनाने यावर उपाययोजना करून हे बसस्थानक अकोला रोडवर असलेल्या आगाराचे जागेत स्थानांतरित करावे.जेणेकरून प्रवाश्याना सोईस्कर होईल. कारण आगारात जागा खूप मोठी आहे. त्यादृष्टीने बस स्थानक हलविणे अत्यंत आवश्यक झाले आहे.
अधिक वाचा : मुर्तिजापूर जवळ ऑटो पलटी,१४ शेतमजूर बालबाल बचावले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola