अकोट(सारंग कराळे) : अकोट चे तहसिलदार विश्वंनाथ घुगे यांच्यावर अकोट शहरातील वकीलानी त्यांच्या कोर्टावर बहिष्कार टाकला असुन त्याबाबतची एक तक्रार व वकील सघांने घेतलेल्या ठरावाची एक प्रत मा.जिल्हाधिकारी कार्यलयात देण्यात आली असुन तहसिलदार विश्वनाथ घुगे यांच्यावर कारवाईची करण्याची मागणी केली.
अकोट चे तहसिलदार घुगे हे वकिलाना उद्धंटपणाची वागणुक देत असतात व त्यांच्या कोर्टात पक्षकाराच्या कामानिम्मत गेले असता विनाकारण टोमणे मारुन गैरवर्तन व अपमानजनक वागणुक देतात अशा प्रकारच्या अनेक तक्रारी वकिलानी केल्यामुळे आकोट वकील सघांच्या अध्यक्षानी व सचिवानी पोपटखेड रोडवरील न्यायमंदिराच्या बार रुम मध्ये दि.१/०९/२०१८ रोजी ला सभा घेऊन सभेपुढे घुगे यांच्या विषयी वकीलानी तक्रारी ठेवल्या असता उपस्तीत सर्वच सदस्यांनी घुगे यांच्या कोर्टावर बहिष्कार टाकुन तहसिलदार घुगेवर कारवाईसाठी वरीष्ठाानकडे तक्रार देण्याचे एकमताने ठरविण्यात आले होते .याबाबत घेण्यात आलेल्या ठरावाला सर्व वकील सघांच्या सदस्यांनी एकमताने ठराव पास करुन समर्थन दिले.तहसिलदार विश्ननाथ घुगे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी अकोट वकील सघांने केली आहे. कारवाई न झाल्यास योग्य पावले उचलण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अकोट तहसिल कोर्टातील वकीलानी माझा बहिष्कार केला नसुन आजही काम सुरळीत सुरु होते-तहसिलदार श्री.विश्वनाथ घुगे ,ता.अकोट जि.अकोला
अधिक वाचा : अकोट शहर पोलिसांच्या राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला चायना मांजा विक्रेत्यांवर धाड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola