मुंबई – आज मंत्रालयीन दालनात मुंबईतील महत्वाची शासकीय सार्वजनिक रुग्णालये, के. ई एम, नायर,जे.जे, सेंट जॉर्ज, सायण हॉस्पिटल या ठिकाणी पथदर्शी प्रकल्प म्हणुन लावलेल्या स्मार्ट टिव्हीची उपयुक्तता व संचलना बाबत विधी व न्याय राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी धर्मादाय आयुक्त, विधि व न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी मुंबईतील विविध सरकारी रुग्णालयांचे तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्टाता आदि उपस्थित होते.
राज्यातील व देशातील विविध मोठ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांचा उपचारासाठी मुंबई कड़े ओढ़ा असतो परंतु या शासकीय रुग्णालयांत जागेच्या उपलब्धते अभावी त्यांच्यावर योग्य उपचार होऊ शकत नाही. मुंबई मधील शासकीय रुग्णालयांत आर्थिक दृष्टया दुर्बल घटकांकरीता राखीव असलेल्या खाटांंची संख्या व त्यांची उपलब्धता या रुग्णांना तात्काळ माहिती व्हावी जेनेकरून तो रुग्ण या शासकीय रुग्णालयांत उपचार घेऊ शकेल. या उद्देशाने लावलेल्या स्मार्ट टिव्हिच्या उपयुक्तते बद्दल, तसेच धर्मदाय रुग्णालयांत गरीब रुग्णांना अधिकाधिक कशी सुविधा मिळेल याबाबत आढावा घेऊन त्यात धर्मदाय संघटना व रुग्णालय यांनी समन्वयाने काम करुण रुग्णांना अधिकाधिक कसा फायदा होईल या करीता सुसूत्रता आणावी असे निर्देश यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना डॉ.पाटील यांनी दिले.
अधिक वाचा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार-२०१८; मनरेगा अंतर्गत महाराष्ट्राला ४ पुरस्कार जाहीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola