मूर्तीजापुर दि.११ ( प्रकाश श्रीवास)- मूर्तीजापुर येथील श्रीमती सरला राम काकाणी एज्युकेशन अँकेडमी या शाळेत लोकशाही पध्दतीने निवडणुकीचे आयोजन करण्यात आले. निवडणुकीची प्रक्रिया लोकशाही पध्दतीने झाली असून विद्यार्थ्यांना आपला आवडीचा व सक्षम उमेदवार निवडण्याची मुभा होती. ही निवडणूक वेगवेगळ्या पदासाठी घेण्यात आली. ती पदे आणि त्या पदावर निवडून आलेले उमेदवार असे आहेत. पंतप्रधान अमन खान,उपपंतप्रधान गौरी सरोदे, शिक्षणमंत्री जागृती देशमुख, उपशिक्षणमंत्री मधुसूदन शर्मा, क्रीडा मंत्री विश्वजित थोरात, कुणाल घोरमोडे, पर्यावरण मंत्री चैतन्य सोळंके, विपुल अग्रवाल, स्वच्छता मंत्री निधी चव्हाण, सांस्कृतिक मंत्री प्रेरणा चव्हाण, स उद ऐरार,हे निवडणूक आले आहेत. ही निवडणूक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. निकाल जाहीर करतांना शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा डॉ. सौ.सरीता सिकची, मुख्याध्यापीका संध्या दारकाप्रसाद दुबे, डॉ. राधेश्याम सिकची आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : पाण्याअभावी सोयाबीन पिकाची गंभीर अवस्था,शेतकरी दुष्काळाच्या छायेत
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola