मूर्तीजापुर ( प्रकाश श्रीवास)– तालुक्यातील बऱ्याच भागातील शेतकरी पाण्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा पेरा केला आहे. पिके जरी हिरवीगार दिसून येत असतील पण पाण्याअभावी शेंगा भरल्या नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मूर्तीजापुर तालुक्यात यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचा मोठ्या प्रमाणात पेरा केला आहे. सुरुवातीला तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस पडला. त्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला.पण पिकाला आवश्यक अश्या प्रमाणात पाऊस पडला नाही. त्यामुळे आजरोजी सोयाबीन पिकांची गंभीर अवस्था निर्माण झाली आहे. चांगल्यात चांगल्या प्रमाणात उत्पादन म्हणून सोयाबीन पिकाचीओळख आहे. सोयाबीन पासुन अनेक उत्पादन तयार करण्यात येतात.पण यंदा या पिकाची अवस्था बिकट झाली असून शेतकरी पाण्यासाठी चातकासारखी वाट पाहून आभाळाकडे एकटक लक्ष देवुन आहे. कारण आज अनेक ग्रामीण भागातील सोयाबीन पिक वाळण्याच्या मार्गावर आले आहे.
पिकेहिरवीगार जरी दिसत असेल पण त्या पिकाला जिवनदान म्हणून वरील पावसाची नितांत आवश्यकता आहे. गजबजून आलेल्या शेंगा भरण्यासाठी एक पाणी आवश्यक आहे. ज्या गावातील शेतातील पाणी वाहून गेले त्या पिकांनी माना खाली टाकणे सुरु केले आहे. अत्यंत बिकट अवस्था आज शेतकऱ्यांची झाली आहे. ज्याच्याकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे. त्या शेतकऱ्यांनी पाणी देवुन पिकाला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. पण ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची काही सोय नसल्याने त्या शेतकऱ्यांवर आज उपासमारीची वेळ आल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे. जर आठवड्यात पाणी नाही पडले तर सोयाबीन पिक हातातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी माहिती प्रगती शेतकरी मंडळ जांभा खु।। चे अध्यक्ष राजु साहेबराव वानखडे यांनी दिली आहे.
अधिक वाचा : मुलीची छेड काढणाऱ्या तरुणाचा संतापलेल्या पित्याने केली चाकूने वार करून हत्या
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola