पुणे महापालिकेतील आरक्षित जागेवर निवडून आलेल्या सात नगरसेवकांनी वेळेत जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्याचे पद रद्द करण्याची शिफारस पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी राज्य सरकारकडे केली.मे. सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूरमधील सदस्यांचे पद रद्द केल्यानंतर या निर्णयाचा फटका पुण्यातील नगरसेवकांनाही बसला आहे. यात सर्वाधिक पाच नगरसेवक सत्तधारी भा.ज.पा.चे आहेत, तर दोन राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या मुदतीत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. निवडणूक आयोगाकडून तशी तरतूद करण्यात अली आहे. या संदर्भातील याचिकेवर निकाल देताना मे.सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर शहरातील तब्बल 20 नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय दिला. मे.न्यायालयाचा हा निर्णय सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भा.ज.पा.चे पाच आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांवर कारवाई करण्यात आले आहे.
कारवाई झालेल्या सातपैकी सहा नगरसेविका आहेत. यात किरण जठार, फरजाना शेख, वर्षा साठे, कविता वैरागे आणि आरती कोंढरे या भा.ज.पा.च्या नगरसेविकांचे पद रद्द होणार आहे. राष्ट्रवादीच्या नगरसेविका रुक्साना इनामदार आणि नगरसेवक बाळा धनकवडे यांचेही पद जाणार आहे. आयुक्तांच्या शिफारशीनंतर राज्य सरकार पद रद्द झाल्याचा स्वतंत्र आदेश काढणार आहे.
महापालिकेत भा.ज.पा. सत्ताधारी पक्ष आहे. त्यांचे संख्याबळ 97 वरून 92 वर येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ 42 करून 40 वर येईल. एकाच वेळी इतक्या नगरसेवकांचे पद रद्द होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. मे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने याबाबत महापालिका आयुक्तांना अशा नगरसेवकांकर कारवाई करण्याचा आदेश दिला होता.
अधिक वाचा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार पुरस्कार-२०१८; मनरेगा अंतर्गत महाराष्ट्राला ४ पुरस्कार जाहीर
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola