अकोट(सारंग कराळे): अकोट तालुक्यातील उमरा हे गांव जवळपास सर्व जाती धर्माचे ७हजार लोकवंस्तीच्या गावात शेकडो वंर्षाची पंरपरा आजही मोठ्या उत्साहाने जोपासली जात आहे. बळीराजाचा सोबत खाद्याला खादा देऊन शेतात राबराब राबणारा मिञ म्हणजे बैल या बैलप्रती कृतज्ञता व्यंक्त करण्याचा सण म्हणजे पोळा पोळ्याच्या दिवशी बैलाना आघोंळ घालुन रंगरगोटी करणे ,सजवुन तोरणाखाली बैलाची मिरवणुक काढण्याची परंपरा संपुर्ण महाराष्टात प्रचंलीत आहे. महाराष्ट्रात नाव लवकीक मिळवणारी प्रथा अकोट तालुक्यातील उमरा हे गावी व्दारंका उत्संवाच्या माध्यामातुन शेकडो वर्षापासुन जोपासली जात आहे.
अकोट तालुक्यातील उमरा या गावी एकआगळी वेगळी ऐतिहासीक परंपरेला अंदाजे तिनशे वर्ष होत असुन या सोहळ्याला द्वारका उत्संव म्हणुन सबोंधले जाते पोळ्याच्या दुसरा दिवशी हा उत्संव उमरा येथील शेतकरी बाधंव साजरा करतात वर्षभर शेतामधे बळीराजा सोबत बैलसुद्धा शेती शिवार फुलवण्यासाठी रक्ताचे पाणी करतात त्यांच्या ञुंर्णबधंणातुन मुक्त होण्यासाठी उमरा येथे बैलगाडीवर फुलाचे आकर्षक असे मखर(रथ) तयार करण्यात येते यामधे बैलाला उभे करुन शेतकरी नवस फेडण्याकरीता व बैलाला चागंले आरोग्य लाभावे म्हणुन शेतकरी बाधंव हा रथ स्वंताच ओढतात यामधे सर्व जाती धर्माचे शेतकरी मोठ्या श्रद्धेने उत्सांहाने सामील होतात. त्यामुळे या द्वांरका उत्संवाला राष्टीय एकात्मतेची कीनार लाभल्याचे दिसुन येते.
अशी पडली ही परंपरा
बैलाच्या चागंल्या आरोग्य साठी अंदाजे ३०० वर्षापुर्वी उमरा गावात ही परंपरा सुरु झाली ते अशी-
साथीच्या आजाराने बैल मुर्त्युुमुखी पडत होते अनेक उपाय करुनही ही साथ आटोक्यात येत नव्हती.त्यामुळे गावकरी गावातील संत पुरुष वाकाजी महाराजाना साकडे घातले व वाकाजी महाराजांनी दिलेल्या औषधामुळे बैलाचा आजार आटोक्यात आल्याची श्रद्धा आहे .तेव्हा पासुन बैलाच्या चागंल्या आरोग्यसाठी ही परंपरा सुरु झाली आहे.
पोळ्याच्या दुसरा दिवशी शेतकरी बैलाना वाकाजी महाराज मंदिरात आणुन प्रदक्षिणा घालतात व शिव पार्वतीच्या प्रतिमेची पुजा करुन त्यांचा आशिर्वाद घेतात. या उत्सांवाला सुरुवात करतात उत्संवातील मानाचा रथही वाकाजी महाराजाच्या वशंजाचा असतो त्यांच्या वशंजाची परंपरा गावकरी सोबत आजही मोठ्या निष्ठेने जोपासली जाते. यावर्षी शिवशक्ती गुर्पच्या वतीने बक्षीस जाहीर केली आहेत या द्वारका उत्सांवात पर्यावरण वाचवण्याचे सदेंश देण्यात आले .हा द्वारका उत्संव शांततेत पार पाडण्याकरीता संपुर्ण गावातील गावकरी मडंळी मोठ्या एकतेने परीश्रम घेतात. अकेट गा्मिण पोलीसाचा बदोंबस्त ठेवण्यात आला होता द्वारका उत्सांवाला पाहण्याकरीता आजबाजुच्या गावातील नागरीक मोठ्या प्रमाणात हजरी लावत असतात.
अधिक वाचा : थांबऊ पर्यावरणाचा ऱ्हास, संगे बनवु बाप्पा खास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola