तेल्हारा (विकास दामोदर ) : घोडेगाव ता.तेल्हारा जि.अकोला येथील पोळा दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा उत्साहात व आनंदात साजरा झाला.
सर्व गावकरी मंडळी आपल्या बैलांसह सहभागी होत पोळ्याला सुरवात केली. सामाजिक एकोपा निर्माण व्हावा सर्वधर्मसमभावाचे वातावर असावे असा संदेश देन्याचा प्रयत्न करत सुंदर सजावट, रंग, साज चळवत या करीता नेहमी प्रमाणे या वेळेस सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, घोडेगाव ने तालुका अध्यक्ष प्रा.प्रदिपभाऊ ढोले यांच्या मार्गदर्शनात निवडक बैलजोडी शेतकरी, यांचे योग्य पारितोषिक देऊन व श्रीफळ,दुपट्टा देऊन मानपान व सत्कार केला आणी वृषभराजा कडे प्रार्थना केली,
ईडा पिडा ,टळो बळीच राज्य येवो.
या करीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते, गावतील प्रतिष्ठीत नागरीकअंबादास ढोले ,मधुकर ढोले गुरुजी, सुखदेवराव दामोदर , बाळकृष्ण बुंदे, राजू ढोले , अजय दामोदर , मुब्त्शीर खान , फारुख जमदार, खालील बेग ई . शेतकरी शेतमजुर,सर्वांचे सहकार्य लाभले.
अधिक वाचा : व्हिडिओ: तेल्हारा येथील अनोखा पोळा सण
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola