अकोट(सारंग कराळे)- अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोर्डी येथील रमेश रामचंद्र खिरकर, देवानंद रमेश खिरकर या पिता-पुत्राच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बोर्डी येथील रामकृष्ण लक्ष्मण तायडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तायडे यांचे जवळ देशी-विदेशी दारू पिण्याचा परवाना आहे. तायडे हे स्वतःकडे पाच ते सहा देशी दारूचे कॉटर स्वतःसाकडे बाळगू शकतात. असे असतांना रमेश खिरकर हे वारंवार तायडे यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याच्या धमक्या देऊन दरमहा पाचशे रुपये मागत होता. त्यामुळे यापूर्वी दोन वेळा पैसे दिलेही होते त्यानंतर पैसे देण्यास नकार दिला, त्यानंतर खिरकर यांनी फिर्यादीला पैसे मागण्याचा सपाटा लावला पैसे न दिल्यास एसपी ऑफिस मध्ये तक्रार करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याची धमकी दिली. अकोट ग्रामीण पोलीस माझे ओळखीचे आहेत तुला पैसे द्यावेच लागतील असे धमकावले.७ सप्टेंबर दुपारी ५ रामकृष्ण तायडे हे शेतातून पायी येत असतांना नागास्वामी मंदिर जवळ देवानंद खिरकर हा दुचाकीवरून समोर आला.त्याने रस्ता अडवून एक हजार रुपये मागितले. पैसे न दिल्याने शिवीगाळ केली. अशी तक्रार रामकृष्ण तायडे यांनी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.त्यावरून पोलिसांनी रमेश रामचंद्र खिरकर व देवानंद रमेश खिरकर यांच्या विरोधात भादवीच्या ३४१,३८४,३८५,५०४, ३४ कलमाप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास मिलिंदकुमार बहाकार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय शहाजी रुपनर करीत आहेत.
अधिक वाचा : सावत्र आईच्या सांगण्यावरून गँगरॅप, प्रायव्हेट पार्टमध्ये अॅसिड ओतले, डोळे फोडले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola