अकोट(सारंग कराळे)-अकोट तालुक्यातील बोर्डी येथे केंन्द्रीय जिल्हा परीषद शाळा बोर्डी यांनी थांबऊ पर्यारवणाचा ऱ्हास संगे बनलु बाप्पा खास या ओळीना डोळ्यांसमोर ठेवुन केंद्रीय जिल्हा परिषद शाळा बोर्डी ,यांनी पर्यावरण पूरक गणेश मूर्ति निर्मिति कार्यशाळेचे आयोजन केले होते. जिल्ह्यातील ठिकठिकाणी पर्यावरण पूरक गणेश मूर्ति निर्मिति कार्यशाळेचे आयोजन करुण शाळु व चिकन माती पासून गणेश मुर्त्या साकारण्यात येत आहे गणेशोत्सव काही दिवसावर येऊन ठेपला असुव ,गणेशोत्सव काळात प्लॉस्टर ऑफ़ पँरिसच्या गणेश मूर्तिंची स्थापना केली जाते ,प्लास्टर ऑफ़ पँरिसची मूर्ति अनेक काळ पाण्यात विरघळत नसल्याने पर्यावरनाचा ऱ्हास होतो याला पर्याय म्हणून गणेशोत्सव काळात ,सर्वानी पर्यावरण पूरक शाळु व चिकन मातीच्या गणेश मूर्तिंची स्थापना करूया! पर्यावरणाचे रक्षण करूया ! हा संदेश देत जिल्ह्यातील केंद्रीय जिल्हा परिषद मराठी शाळा बोर्डी यांनी शाळेतेच विद्यार्थाच्या कलागुणानां वाव मिळावा व त्यातून संपूर्ण गावात पर्यावरण पूरक गणेश मूर्तिंची स्थापना व्हावी या दृष्टि कोनातून ,गणेश मूर्ति निर्मिति कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते ,या मधे शाळेतिल सर्व विद्यार्थी चा समावेश होता, कलाशिक्षक प्रवीण चिकटे यांनी विद्यार्थ्याना गणेश मूर्ति निर्माणासाठी मार्गदर्शन केले ,यावेळी तैयार केलेल्या गणेश मुर्ती शिक्षक तसेच विद्यार्थी आपल्या घरी 10 दिवस स्थांपन करणार आहेत .या कार्यशाळेच्या माध्यमातून पर्यावरण पूरक गणेश मूर्तिंचे निर्माण होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल असे मत कार्यशाळाचे मार्गदर्शन श्री .प्रविण चिकटे (कला शिक्षक )यांनी व्यक्त केले या कार्यशाळे मधे सहभागी शिक्षक सजंय साळुखे श्री कैलास बा देशमुख प्रकाश बिहाडे ऊमेश चोरे अजय अस्वार,अरुण पुरी व शिक्षिका निर्मला आंबिलकर,सुवर्णा शेगोकार, किरण लहाने,रुपाली साबळे, यानी सहभाग घेतला.
अधिक वाचा : डोक्यात पंखा मारून पत्नीची हत्या तर पतीने केली आत्महत्या, हत्या आत्महत्या ने अकोला जिल्हा हादरला
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola