मुंबई : भा.ज.पा.चे आमदार राम कदम यांचा वाचाळगिरीचा प्रताप ताजा असतानाच आता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आता भर घातलीये. माध्यमांमुळे समाजात राजकारणाची घाणेरडी प्रतिमा तयार झालीय आहे असं वादग्रस्त शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलंय. एवढंच नाहीतर माध्यम दाखवतात त्या सगळ्याच बातम्या खऱ्या नसतात असा जावाईशोधही तावडे यांनी लावलाय.मुंबईतील विल्सन कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाच्या उद्धाटनासाठी विनोद तावडे आले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांपैकी कुणाला राजकारणात यायचंय असा प्रश्न तावडेंनी उपस्थित केला. त्यावर विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद आल्यानं राजकारणाला बदनाम करण्यासाठी माध्यम जबाबदार आहे असं मत तावडेंनी व्यक्त केलंय.
शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी असं वक्तव्य करणे हे धक्कादायक आणि संतापजनक आहे. त्यांनी सर्व माध्यमांची जाहीर माफी मागावी अशी मागणी ज्येष्ठ पत्रकार एस.एम. देशमुख यांनी केली.विनोद तावडे यांनी याआधीही वादग्रस्त निर्णय घेतल्यामुळे टीकेचे धनी झाले होते ‘आम्हा राजकीय नेत्यांना सगळंच फुकट द्यायची सवय असते. नागरिकसुद्धा जेवढे जेवढे फुकट मिळेल तेवढे बरं याच मूडमध्ये असतात,’ असं वक्तव्यही विनोद तावडे यांनी मागील वर्षी कल्याणमध्ये एका कार्यक्रमात केलं होतं.
अधिक वाचा : पत्रकारांशी मैत्री करा, भाजप खासदार-आमदारांना आदेश
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola