मूर्तीजापुर(प्रकाश श्रीवास)- भाजपाचे आमदार राम कदम यांनी मुंबई येथील एका दहीहंडीच्या कार्यक्रमात महीलांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केले आहे. त्याच्या या विधानामुळे समाजात त्याच्या प्रति तिव्र नाराजी व्यक्त करण्यात आहे. त्यांनी केलेले विधान अत्यंत चुकीचे आहे. त्याच्या विरूद्ध विविध कलमान्वये गुन्ह दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी राहुल तायडे यांना एक निवेदन देवुन करण्यात आली आहे.भारतीय जनता पक्षाचे आमदार राम कदम यांनी मुंबई येथे एका दहीहांडीच्या कार्यक्रमात भाषण देताना ” तुम्हाला जी मुलगी पसंद असेल त्याबद्दल मला सांगा मी त्या मुलीला तिच्या घरातून उचलून आणेल ” असे चुकीचे महीलांच्या विरोधात आक्षेपार्ह शब्द वापरले आहे. भारतात विविध जाती धर्माचे लोक राहतात. तसेच भारत देश हा सुसंस्कृत देश आहे. येथे महीलांचा आदर केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे संस्कार राज्याला दिले आहेत.
परंतु आमदार सारख्या माणसाने महीलांचा व मुलींचा सम्मान करण्याव्यतिरिक्त तो गुंड बनून लोकाच्या भावनेला इजा पोहचविण्याचे कार्य करीत ही मोठी लाजीरवाणी व न शोभणारी बाब आहे. जर सत्ताधारी माणुस,एक आमदार जर असे विधान जाहीर सभेत करीत आहे. त्यामुळे आपल्या संस्कृतीचा अपमान तर होतोच तसेच मुलींना घरातून उचलण्यास सुरुवात होणार आहे. भारतीय संस्कृती ही भावना, वडिलांना तसेच घरातील सदस्य यांना महत्त्व देवुन त्या मुलीकरीता चांगले वर शोधतात.परंतु जर आमदार सारख्या व्यक्ती ने असे न शोभणारे विधान केल्याने महीलांच्या भावना फार दुखावल्या गेल्या आहेत. असे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राम कदमाविरूध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाका अशी मागणी करणारे एक निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार राहुल तायडे यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे जिल्हाअध्यक्ष निजाम इंजिनिअर, समाजसेवक रवि रमेशचंद्र राठी, युवक काँग्रेस चे शहर अध्यक्ष अ.जावेद अ.बाकी, माजी नगरसेवक राम कोरडे, सिधार्थ तायडे, अमोल लोकरे,मुकेश अटल,सै.वसीम,निलेश अव्वलवार,राहुल भटकर,विशाल शिरभाते, राहुल भटकर,अजय गोरले,मुदस्सीर खान युसूफ खान,अक्षय वैध,मनिष बनारसे, सुरेश भांडे,रवींद्र चौरपगार,गोकुळ फुके,निखील ठाकरे, अखील भटकर, मयूर वहीले,आदी उपस्थित होते.
अधिक वाचा : समलैंगिक संबंध हा गुन्हा नाही ; सर्वोच्च न्यायालय
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola