तेल्हारा(प्रतिनिधी)- तेल्हारा खरेदी विक्री संस्थेचे अध्यक्ष यांच्यावर आलेल्या अविश्वास प्रस्तावाची प्रत घेऊन गेलेल्या सहाय्यक निबंधकास अध्यक्ष यांच्या भावाने मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली.याप्रकरणी तेल्हारा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. खविस चे अध्यक्ष पुंडलिक अरबट यांच्यावर संस्थेच्या नऊ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.
अविश्वास प्रस्तावाची नोटीस घेऊन आरसुळ येथे त्यांच्या घरी सहाय्यक निबंधक अनिल नादरे व त्यांचे सहकारी हे गेले असता नोटीस अरबट यांच्या घरावर लावत असतांना पुंडलिक अरबट यांचे भाऊ रतन देवलाल अरबट व बंडू नामक व्यक्ती यांनी नोटीस लावण्यास मज्जाव करून मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरनी रतन अरबट व बंडू नामक व्यक्ती यांच्या विरुध्द कलम ३५३,३३२,५०६,३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास तेल्हारा पोलीस करीत आहेत.
अधिक वाचा : तेल्हारा खविसं अध्यक्षाविरूध्द अविश्वास प्रस्ताव दाखल, राजीनामा खरा की अविश्वास
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola