मुंबई : पाच रुपयांमध्ये तुम्हाला चॉकलेट तर मिळेलच पण यासोबत 1 जीबी फ्रि इंटरनेट डेटादेखील मिळाला तर ? विश्वास बसत नाहीयं का ? पण हे खरंय. जिओ सध्या आपला दुसरा वार्षिकोत्सव साजरा करत आहे. यासाठी कंपनीने आपल्या युजर्ससाठी खास ऑफर आणली आहे. जिओ आपल्या यूजर्ससाठी 5 रुपयांच्या चॉकलेटसोबत 1 जीबी डेटा देत आहे. यासाठी तुम्हाला काही वेगळं करण्याची गरज नाही.
फ्री डेटा मिळविण्यासाठी फक्त कॅडबरी डेयरी मिल्क चॉकलेटचं रिकामी पॅकेट लागणार आहे. डेयरी मिल्क क्रॅकल, डेयरी मिल्क रोस्ट बदाम, डेयरी मिल्क फ्रूट अॅण्ड नट आणि डेयरी मिल्क लिकेबल्ससोबत हा फ्री डेटा मिळतोयं. मोफत डेटासोबत रिलायन्स जिओने यूजरला दूसऱ्या जिओ सबस्क्राय्सला फ्री डेटा ट्रान्स्फरची सुविधा दिली आहे. 30 सप्टेंबर 2018 पर्यंत ही ऑफर आहे. याशिवाय तुमच्याकडे MyJio अॅप असणं गरजेचं आहे.
माय जिओ अॅपच्या होमस्क्रिनवर मोफत डेटा ऑफरचा बॅनर लाईव्ह झाला आहे. तुम्ही त्यावर क्लिक केल्यावर पेज उघडले जाईल. तिथल्या Participate Now बटणावर क्लिक करा. यानंतर डेअरी मिल्कच्या रिकामी पॅकेटवरील बारकोड स्कॅन करुन मोफत डेटा मिळवावा लागेल.
अॅक्टिव युजर्स हा डेटा स्वत: वापरू शकतात किंवा दुसऱ्यालाही पाठवू शकतात. मोफत डेटा माय जियो अॅपव 7 ते 8 दिवसात येईल. यानंतर जिओ अॅपवर केवळ रॅपरच्या मदतीनेच फ्री डेटा मिळवला जाऊ शकतो.
अधिक वाचा : एटीएम मधून आता कार्ड शिवाय पैसे काढता येणार
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola