आयएसएसएफ (ISSF) वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ज्युनिअर १० मीटर एअर रायफल स्पर्धेत भारताचा युवा नेमबाज हृदय हजारिकाने सुवर्ण पदक पटकावले. आज झालेल्या स्पर्धेत त्यानं इराणच्या मोहम्मद आमीर नेकूनामपेक्षा चांगली कामगिरी करून भारताला ‘गोल्ड मेडल’ मिळवून दिले.
हृदय हजारिकाने ६२७.३ गुण मिळवून सुवर्ण पदक पटकावले. इराणचा मोहम्मद आमीर २५०.१ गुण मिळवित दुसऱ्या स्थानावर राहिला. त्याला रौप्य पदक मिळाले तर रशियाच्या ग्रिगोरी शामाकोवला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. भारतीय नेमबाज संघ १८७२.३ अंकाच्या गुणासह चौथ्या स्थानावर राहिला. वरीष्ठ गटात भारताच्या पदरी निऱाशा पडली. एकाही भारतीय खेळाडूला फायनलमध्ये धडक मारता आली नाही. आशियाई स्पर्धेतील रौप्य पदक विजेता संजीव राजपूत ५८ व्या स्थानावर राहिला. स्वप्निल कुसाले ५५ तर अखिल शेरोन ४४ व्या स्थानावर राहिला. भारतीय संघालाही साजेशी कामगिरी करता न आल्याने ११ वे स्थान मिळाले.
A thrilling shoot-off decided the gold medalist of the 10m Air Rifle Men Junior event. #ISSFWCH pic.twitter.com/D8h3fpzoRX
— ISSF (@ISSF_Shooting) September 7, 2018
काल झालेल्या आयएसएसएफच्या स्पर्धेत आशियाई सुवर्ण पदक विजेता सौरभ चौधरीने जागतिक विश्वविक्रमाची नोंद करून भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. तर वरीष्ठ नेमबाजपटूंनी रौप्य पदक पटकावले. सौरभ चौधरीशिवाय अर्जुन सिंग चीमानेही कांस्य पदक पटकावले.
अधिक वाचा : भारत Vs इंग्लंड : आज शेवटची टेस्ट मॅच
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola