नवी दिल्ली- २०१९ ला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘काय करावे’ आणि ‘काय करू नये’ याबाबतची भाजप ने ६५ पानी आदेशावली तयार केली आहे. सगळ्या खासदार आणि आमदारांना या आदेशावलीची प्रत देण्यात येणार आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना आता कंठ फुटला असून, वाचाळवीर तयार झाले आहेत. त्यांच्या विधानांमुळे वाद निर्माण व्हायला लागले असून प्रसारमाध्यमांमुळे त्यांची बेताल विधाने देशभरात पोहचायला लागली आहेत. यामुळे पत्रकारांशी मैत्री करा जेणेकरून पक्षाची चांगली प्रतिमा प्रसारमाध्यमांद्वारे जनतेसमोर उभी राहील असा आदेश या आदेशावलीद्वारे देण्यात आला आहे.
२०१४ साली सत्तेवर येण्यापूर्वी भाजपने सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता. सत्तेत आल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळे मंत्री ट्विटर आणि फेसबुकवर सक्रिय आहेत. हाच ट्रेंड पुढेदेखील चालू ठेवण्यात येणार आहे. भाजपने त्यांच्या लोकप्रतिनिधींना सोशल मिडीयावर आता अॅक्टीव्ह व्हा असे सांगितले आहे. पक्षाने आदेशावली एका पुस्तकाच्या स्वरुपात काढली आहे. यामध्ये पक्षाची ध्येयधोरणे, केंद्र सरकारच्या योजना, आव्हाने याबातही माहिती देण्यात आली आहे.
लोकप्रतिनिधींच्या खासगी सचिवांसाठी गुरुवारी आणि शुक्रवारी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये कार्यालयात आलेल्या लोकांशी कसे बोलावे, पत्रकारांशी सौजन्याने वागावे, त्यांना फार काळ ताटकळत ठेवू नये अशा सूचना देण्यात येणार आहेत. या कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना माहिती देण्याचं काम करू नये त्याऐवजी त्यांनी पत्रकार आणि लोकप्रतिनिधींमधील दुवा बनावे अशी सूचनाही देण्यात आली आहे.
अधिक वाचा : आ. राम कदम यांच्यावर कारवाई न झाल्यास विधानसभा चालू देणार नाही- राधाकृष्ण विखे पाटील
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola