हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने फ्लोरिडा येथे निधन झाले. १९६१ मध्ये आलेल्या ‘अँजल बेबी’ या चित्रपटातून त्यांनी हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘अवर मॅन फ्लिंट’, ‘व्हाइट लाइटनिंग’, ‘द मॅन हू लव्ह्ड कॅट डान्सिंग’, ‘लकी लेडी’ यांसारख्या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते.
‘डॅन ऑगस्ट’ आणि ‘गन स्मोक’ यासारख्या टीव्ही शोमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. १९९७ मध्ये ‘बुगी नाइट्स’ या चित्रपटासाठी ऑस्कर नामांकन मिळाले होते. ‘इव्हिनिंग शेड्स’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ‘गोल्डन ग्लोब’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola