व्हॉट्सअॅप ने आपल्या आयफोन युजर्ससाठी एक नवे फिचर आणले आहे. आयफोन युजर्स आता कोणत्याही मेसेजमध्ये आलेली मीडिया फाईल आणखी सोप्या पद्धतीने पाहू शकतात. मेसेजमध्ये पाठवलेली लिंक संशयास्पद आहे की नाही हेही पाहता येणार आहे.
व्हॉट्स अॅप अपडेट केल्यानंतर हे नवं फिचर उपलब्ध होईल. व्हॉट्स अॅपच्या युजर इंटरफेसमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. नव्या फिचरद्वारे मेसेजचं नोटिफिकेशन आलं की त्यातच मीडिया फाईल्स पाहता येणार आहेत. नोटिफिकेशनवर टॅप केलं की फाईल पाहाता येईल. या नव्या फिचरमध्ये अशाच प्रकारे GIF चं प्रिव्ह्यूदेखील दिसणार आहे.
युजर्सना एखाद्या मेसेजसोबत जर युआरएल लिंक येत असेल तर व्हॉट्स अॅप स्थानिक पातळीवर ती लिंक संशयास्पद आहे वा नाही हे पडताळून पाहील. जर लिंक संशयास्पद असेल तर ‘संशयास्पद लिंक’ असं स्पष्ट शब्दात त्या लिंकवरच लिहून येईल. यामुळे फेक न्यूजला काही प्रमाणात आळा बसणार आहे.
हे नवं फिचर आयओएस ७ आणि त्यापुढील व्हर्जनवर चालणाऱ्या मोबाईलसाठी काम करत आहे. म्हणजेच ते आयफोन ४ आणि पुढील व्हर्जनसाठी चालणार आहे. अँड्रॉइड युजर्ससाठी हे फिचर कधी येणार ते अद्याप सांगण्यात आलेले नाही.
अधिक वाचा : इन्स्टाग्रामचे लवकरच येणार शॉपिंग अॅप