इन्स्टाग्राम हे तरुणांमध्ये वापरले जाणारे एक महत्त्वाचे सोशल मीडिया माध्यम आहे. मागच्या काही काळात या अॅपमध्ये झालेल्या सुधारणांमुळे त्याचा वापर वाढला आहे. सोशल मीडियाचा वापर वाढला असून हल्ली ऑनलाईन खरेदीकडेही ग्राहकांचा कल वाढलेला दिसतो. ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. इन्स्टाग्राम लवकरच आपले शॉपिंग अॅप दाखल करत असून या माध्यमातून आता खरेदी करता येणार आहे. आयफोन आणि अँड्रॉईड या दोन्हीसाठी वेगवेगळी अॅप्लिकेशन्स असतील असे कंपनीने सांगितले आहे. हे अॅप्लिकेशन ई-कॉमर्ससाठी काम करेल असे सांगण्यात आले आहे.
हे अॅप्लिकेशन वेगळे असून ते इन्स्टाग्रामशी कनेक्ट असेल असे सांगण्यात आले आहे. हे अॅप नेमके कधीपर्यंत वापरासाठी उपलब्ध होईल याबाबत मात्र अद्याप कंपनीकडून काही सांगण्यात आलेले नाही. अशाप्रकारचे शॉपिंग फिचर लाँच करण्यासाठी कंपनीने २०१६ पासून प्रयत्न सुरु केले असून लवकरच ते पूर्ण होण्याच्या बेतात आहेत. या अॅपद्वारे युजर्सना आपल्या आवजीच्या ब्रँडच्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. हे अॅप लाँच झाल्यास इन्स्टाग्रामच्या आर्थिक स्थितीतही वाढ होईल असे म्हटले जात आहे. याआधीही इन्स्टाग्रामने युट्यूबला टक्कर देण्यासाठी लाईव्ह स्ट्रीमिंगचे अॅप तयार केले होते. त्याचप्रमाणे आता बाजारातील प्रस्थापित शॉपिंग अॅपला टक्कर देण्यासाठी हे शॉपिंग अॅप तयार करण्यात येत आहे.
अधिक वाचा : आयडिया-व्होडाफोनचे विलीनीकरण : देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी अस्तित्वात
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola