अकोट (प्रतिनिधी) : आज प्रहार जनशक्ती पक्षाने प्रधानमंत्री घरकुल योजने मधील लोकांवर होत असलेल्या अन्याय विरुद्ध तसेच जिल्ह्यातील आरोग्य केंद्राच्या दयनीय अवस्थे बदल तसेच दिव्यांगाच्या हक्काचा असलेला 3%टक्के निधी लवकरात लवकर वितरित करा या मागणी साठी जिल्हा परिषदे मध्ये मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव घातला .
त्या नंतर मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी लेखी आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या पत्रा मध्ये पुढील प्रमाणे मागण्या मान्य करण्यात आल्या.
(1)2011 साली झालेला प्रधानमंत्री घरकुलचा सर्व्ह हा चुकीच्या पद्धतीने केल्या गेला आहे हा चुकीचा सर्व्ह करणाऱ्या विरुध्द प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या मार्फत कारवाईचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात येणार
(२) घरकुल प्रपत्र. ड.नुसार ग्रामपंचायत निहाय प्रगणका मार्फत सर्व्ह पूर्ण करणार
(3)दिव्यांगाचा 3%निधी 15 दिवसात वितरित करण्या बाबद कारवाही न केल्या संबंधित अधिकाऱ्यानं वर कारवाई करणार
(४)जिल्ह्यातील आरोग्य केंद्राच्या स्थितीबात जिल्हा आरोग्य अधिकारी आरोग्य केंद्रात भेट देवून वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहतात किवा नाही याची खातरजमा करतील.
तसेच ईतर सोई सुविधानबाबद आढावा घेवून त्या बाबदची पूर्तता 3 महिन्यात करण्या बाबद आरोग्य अधिकाऱ्याना आदेश दिले .असे लेखी आश्वासन दिले त्या मागण्यानची अंमलबजावणी न झाल्यास मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या तोंडाला काळ लावल्या शिवाय प्रहार राहणार नाही असा अलटीमेट प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख तुषार पुंडकर यांनी दिला तसेच आंदोलनाचे नेतृत्व मा.जिल्हा संपर्क प्रमुख गजुभाऊ कुडबे यांनी केला या वेळी प्रहार चे शेकडो कार्यकर्ते उपस्तिथीत होते.
अधिक वाचा : अकोट कावड बदोंबस्तात एन.सी.सी.कँडेटचा लक्षंणीय सहभाग
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola