अचलपूर: अचलपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक शांतीलाल पटेल यांच्यावर आज पहाटे अचलपूर शहरातील कुख्यात पाच ते सात गुंडांनी रॉड आणि सलाखीने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. आज सकाळी 4 वाजता लोखंडी रॉडने पटेल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. पोलीस स्थानकाच्या बाजूलाच त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. या घटनेमुळे पोलीस ठाण्यात आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
काल रात्री पोलीस कर्तव्यावर असलेल्या PSI शुभांगी ठाकरे यांनी या सात ते आठ आरोपींना भर रस्त्यावर दारू पीत असताना बघितले असता काहीजण तिथून पळाले तर काहींना पोलीसी खाक्या दाखवला. या आरोपींनी आपल्याला मारहाण झाल्याचा मनात राग धरून पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ठाकरे हीचा पाठलाग सुरू केला पण त्या पहाटेपर्यंत या आरोपींना कुठेच गवसल्या नाहीत. त्याचवेळी पोलीस स्टेशनमधून घरी जात असलेल्या पोलीस कर्मचारी सह-पोलीस उपनिरीक्षक शांतीलाल चुणीलाल पटेल वय ५२ यांना अडवून रॉड आणि सलाखीने डोक्यावर वार केले यामध्ये शांतीलाल पटेल मोठ्या प्रमाणात गंभीर जखमी झाले आहेत.
घटना घडताच त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरता दाखल केलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. यातील तीन कुख्यात आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील आरोपींचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे शांतीलाल पटेल यांच्या पत्नी सुद्धा अचलपूर पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल आहेत.