राजस्थानमधील जोधपूर येथे हवाई दलाचे मिग-२७ हे लढाऊ विमान कोसळले आहे. विमान का कोसळले याची चौकशी सुरु झाली असून वैमानिक या दुर्घटनेतून बचावला आहे. जोधपूरमधील बनाड थाना परिसरात हवाई दलाचे मिग २७ हे लढाऊ विमान कोसळले.
‘नियोजित वेळेनुसार विमानाने उड्डाण केले. मात्र, बनाड थाना परिसरात विमानात तांत्रिक बिघाड झाला. तो लक्षात आल्यावर लगेचच वैमानिकाने त्यातून पॅराशूटच्या साह्याने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. वैमानिक या दुर्घटनेतून बचावला असून तो सुरक्षित असल्याची माहिती हवाई दलाने दिली. या दुघर्टनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असेही हवाई दलातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
गेल्या वर्षभरात मिग २७ हे विमान कोसळल्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी जूनमध्ये जोधपूरमधील निवासी भागात मिग २७ हे विमान कोसळले होते. यात जीवितहानी झाली नसली तरी दोन घर आणि एका कारचे नुकसान झाले होते. तर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही जोधपूर विमानतळावर लँडिंग दरम्यान विमानाचा टायर फुटल्याची घटना घडली होती.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola