पाटीदार नेता हार्दिक पटेल अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसला आहे. आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी हार्दिक पटेलचं उपोषण सुरु आहे. उपोषणाच्या ९व्या दिवशी रविवारी त्यानं मृत्यूपत्र बनवलं आहे. या मृत्यूपत्रात हार्दिकनं आई-वडिल, एक बहिण, २०१५ साली कोटा आंदोलना दरम्यान मृत्यू झालेल्या १४युवकांचं कुटुंब, आपल्या गावातील आजारी गायींचा आश्रय असलेलं ठिकाण यांच्यामध्ये संपत्ती वाटली आहे.मृत्यूनंतर हार्दिक पटेलनं डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ ऑगस्टपासून हार्दिक पटेल उपोषणाला बसला आहे.
तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आरजेडी या पक्षांच्या नेत्यांनी आणि प्रतिनिधींनी हार्दिक पटेलची भेट घेतली आहे. पण भाजप सरकारनं अजून कोणताही हस्तक्षेप केलेला नाही. हार्दिक पटेलची प्रकृती ढासळत आहे. त्यानं मागच्या ९ दिवसांपासून काहीच खाल्लं नाही. मागच्या ३६ तासांपासून त्यानं पाणीही प्यायलं नाही, असं वक्तव्य पाटीदार अनामत आंदोलन समितीचे प्रवक्ते मनोज पनारा यांनी केलं आहे. डॉक्टरांनी हार्दिकला रुग्णालयात दाखल व्हायचा सल्ला दिला आहे. हार्दिकचा रक्तदाब सामान्य आहे, पण त्यानं रक्ताची चाचणी करायला नकार दिला आहे.
अधिक वाचा : पत्रकार परिषद घेऊन पुरावे का उघड केले; मे.न्यायालयाने पोलिसांना फटकारले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola