मुंबई: प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पोलीसांनी पत्रकार परिषद कशी काय घेतली, असा प्रश्न आज मे. मुंबई उच्च न्यायालयाने विचारला. कोरेगाव भीमाप्रकरणी नक्षलवाद्यांशी संबधावरुन राबवण्यात आलेल्या अटक सत्रानंतर पोलिसांच्या पत्रकार परिषदेवर मे.मुंबई उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले. पत्रकार परिषद घेऊन पुरावे उघड करण्याविषयी मे. न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले. भीमा कोरेगावचा तपास एन.आय.एक.डे देण्याबाबत मे.मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. शुक्रवारी अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर केले होते. दरम्यान भीमा कोरेगावचा तपास एन.आय.ए.कडे देण्याबाबत मे.मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान मे.न्यायालयाने पत्रकार परिषदेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ७ सप्टेंबरला या याचिकेवर पुढील सुनावणी होईल.
अधिक वाचा : रेल्वेच्या डब्यांबाहेर आरक्षणाची यादी चिकटवण्याची प्रथा बंद
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola