अकोट (सारंग कराळे): अकोट शहरात दरवर्षी प्रमाणे यांवर्षी सुंद्धा मोठ्या उत्साहात श्रावण मंहिन्याच्या चौथ्या सोमवारी पुर्णा नदिचे पविञ जल आणुन पुरातन तपेश्वरीच्या मंदिरातील शिवलिंगाला जलभिषेक करण्यासाठी शेकडो शिंवभक्त मोठ्या उत्साहाने अकोला नाक्यावरुन कावड याञेला बम बम भोले हर हर महादेव च्या गजरात मिरवणुकीला सुरवात केली व अकोटकरांचे लक्ष्य वेधुन घेतले कावड मिरवणुकीच्या दरम्यान संजवलेल्या कावड वरील देखाव्यांनी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले असुन देखाव्याच्या माध्यमातुन अकोट शहरातील समंस्याना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. इतर देशहितावर देखावे करुन जनजागुर्ती करण्याचा कावड मडंळाचा प्रयत्न कौतुकांस्पद होता. खुप मोठ्या प्रमाणात युवकांचा सहभाग लक्षणिय ठरत होता आगामी निवडणुका डोळ्या समोंर असल्याने मोठ्या प्रमाणात राजकीय पक्ष सह सामाजिक सघंटनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.मिरवणुक मार्गावर जागो जागी स्टॉल लावुन कावड याञेचे स्वागत करुन फराळ ,शरबत ,चहा, थंड पिण्याचे पाणी चे वाटप भक्तीभावाने करण़्यात आले कावड याञेत शहरातील कावड मडंळाना शिस्तंबद्ध पद्धतीने टोकन नबंर देण्यात आले होते त्याप्रमाणे कावड मडंळानी चागंला प्रतिसाद देत सहभाग घेतला त्यामधे गणपती मडंळ गणेश मदीर ,पचंमुखी महादेव सस्थांन याञा चौक,शिवभक्त कावड मडंळ शनवार पुरा ,तपेश्वरी कावड भवानी पुरा.जय भवानी कावड मडंळ,रामटेक पुरा ,श्रावण बाळ कावड मडंळ बारगाण ,जयशक्ती शिवभक्त मडंळ दखंनी फाईल नवहिंद ग्रुर्प याञा चौक,नंदिकेश्वर मडंळ नंदिपेठ ,क्रांती ग्रुर्प सोमवार वेस जय भोले डोहरपुरा,नाथुबाबा टाकपुरा,भयानक शिवभक्त मडंळ ,विरसग्रांम अजंनगाव रोड महर्षी वाल्मिकी मडंळ वाल्मिक नगर ,छावा कावड रामटेक पुरा ,जय ग्वाला ग्रुप, सत्यविजय टॉकीज,विर लहुजी भोईपुरा शिवशक्ती शनिवारा ,विर शिवभक्त मडंळ ,मातंग पुरा,जय महारुद्र जेतवन नगर ,जय गजानन कावड मडंळ गजानन नगर, मोरया शिवभक्त मडंळ गोवारी पुरा,महाकाल अजंनगाव रोड अकोट एकुण २४ मंडळ व हजारो शिवभक्त मिरवणुकीत सामील झाले होते .यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखालीअकोट शहर ठाणेदार गजानन शेळके , यांनी यावेळी चोंख पोलीस बदोंबस्त ठेवला होता.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola