तेल्हारा(शुभम सोनटक्के)- तेल्हारा खविसचे अध्यक्ष पुडलीक अरबट यांनी एक महिन्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यात ३१ ऑगस्ट रोजी संस्थेच्या ९ संचालकांनी त्यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला. मात्र यात अध्यक्ष यांनी दिलेला राजीनामा व ९ संचालक यांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव यामध्ये नेमका राजीनामा खरा की अविश्वास प्रस्ताव हे मात्र यामध्ये गुलदस्त्यात आहे.या कुरघोडीच्या राजकारणात मात्र खविसचा कारभाराला मात्र लगाम लागल्याचे चित्र आहे.
तालुका खरेदी,विक्री संस्थेचे अध्यक्ष तथा जि.प शिक्षण सभापती पुंडलिक अरबट यांच्या विरोधात खरेदी विक्रीच्या ९ संचालकांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे ३१ अॉगस्ट रोजी अविश्वास प्रस्ताव दाखल केला पुंडलीकराव अरबट यांनी सुमारे एक महीण्यापुर्वी खरेदी विक्री संस्थेच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा सहा निबंधक तेल्हारा यांच्याकडे दीला होता पन तो. राजीनामा देउनही नव्या अध्यक्ष पदाची निवडनूक कार्यक्रम न लावता या ना त्या कारणाने पुढील कार्यवाही सुरू होती व संस्थेची सभापती घेणेसुध्दा सुरूच होते त्यामुळे अखेर जिल्हा उपनिबंधक अकोला यांच्याकडे ३१ अॉगस्ट रोजी नउ संचालकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला.
या कारणावरून अविश्वास झाला दाखल
* संस्थेचे अध्यक्ष अरबट हे संचालकांना विश्वासात घेत नाहीत.
* संचालकांना चांगली वागणूक देत नाहीत
* भविष्यात संस्थेच्या हिता संबंधी योग्य प्रकारे कामकाज नाही.
या कारणावरून अविश्वास दाखल करण्यात आला.
अधिक वाचा : लोकजागर मंच तर्फे अकोटात भंव्य कावड स्पर्धेचे आयोजन
खविस च्या अध्यक्षांनी दिलेला राजीनामा हा संचालक मंडळाच्या सभेत ठेऊन मंजूर करण्यात आल्यानंतर आमच्याकडे पाठवणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही यासंदर्भात कारवाई सुरू असताना अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला.यापुढील कारवाई प्राधिकृत अधिकारी करतील.
(गोपाल माळवे)
जिल्हा निबंधक अकोला.
खविस च्या अध्यक्ष पदाचा राजीनामा मी ३१ जुलै रोजीच दिला असून राजीनामा मंजूर झाला आहे.यासंदर्भात शहानिशा करण्यासाठी सहायक निबंधक तेल्हारा यांचे पत्र प्राप्त झाले आहे.जो पर्यंत नवीन अध्यक्षाची निवड होत नाही तिथपर्यंत मी प्रभारी अध्यक्ष म्हणून कामकाज पाहत आहे राजीनामा दिल्यानंतर व मंजूर झाल्यानंतर अविश्वास ठराव हा राजकीय सुडबुद्धी व खोडसाळपणा ने दाखल करण्यात आला आहे.
(पुंडलिक अरबट)
अध्यक्ष खविस तेल्हारा
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola