इंग्लंडचा माजी कर्णधार आणि ३३ वर्षीय अनुभवी फलंदाज अॅलिस्टर कूक याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. भारताविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेनंतर तो निवृत्त होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तो पूर्णपणे निवृत्त होणार असल्याची माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान तो आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे.
कुक हा इंग्लंडकडून सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज आहे. कुकने अद्याप १२ हजार २५४ धावा केल्या असून कसोटी फलंदाजांच्या सर्वाधिक धावांच्या यादीत तो ६व्या क्रमांकावर आहे. आपल्या ६० कसोटी सामन्यात त्याने ३२ शतके आणि ५६ अर्धशतके झळकावली आहेत.
आता माझ्यात क्रिकेट शिल्लक राहिलेले नाही. मला क्रिकेटने अपेक्षेपेक्षा खूप काही अधिक दिले. इंग्लंडचे प्रतिनिधित्व करताना अनेक महान खेळाडूंचा मला सहवास लाभला हे माझे भाग्यच आहे. कुकने सर्वाधिक ५९ कसोटींमध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले आहे.
अधिक वाचा : धावपटू दुती चंद ने जिंकले रौप्य पदक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola