अकोट (सारंग कराळे)– अकोट शहरा मध्ये कावड उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो, ह्या वर्षी एकूण 24 कावड वाजत गाजत मिरवणुकी मध्ये सामील होणार असून अकोट शहरात जेवढ्या मिरवणुका निघतात त्या पैकी सर्वात मोठा मिरवणूक मार्ग हा कावड मिरवणुकीचा असतो, शिवभक्त रात्रीच गांधीग्राम येथे जाऊन पूर्णा नदीचे जल आणून अकोला नाका येथून एका मागोमाग एक असे वाजत गाजत अकोट शहराच्या प्रमुख भागातून मिरवणुकी द्वारे जाऊन तापेश्वराला जलाभिषेक करून कावड उत्सवाची सांगता होते.
कावड उत्सवात 7ते 8 हजाराचा जमाव असतो, अकोट शहराची संवेदनशीलता पाहता अकोट शहर पोलिसांनी चोख तयारी केली असून कावड उत्सवा दरम्यान शांतता राहावी म्हणून पोलिसांनी उपविभागीय अधिकारी अकोट ह्यांचे आदेशाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या एकूण 31 व्यक्तींना अकोट शहरातून 3 दिवसा साठी हद्दपार करण्यात आले असून कावड उत्सव संभधाने एकूण 98 व्यक्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, अकोट शहरातील प्रमुख चौका मध्ये व मार्गावर पोलिसांनी बंदोबस्त लावला असून उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी शहरात चोख बंदोबस्त कावड उत्सवा दरम्यान लावण्यात आला आहे.
अधिक वाचा :अकोटातील शा.कञांटदार सतोंष चाडंक यांच्या डॉ मुलीचा ह्दयविकांराच्या झटक्याने रेल्वेत अचानक मृत्यु
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola