अकोट (सारंग कराळे) : अकोट शहरात गाजत असलेला बोगस डॉक्टर निखिल गांधी प्रकरणात आरोपी असलेले डॉक्टर केला, व डॉक्टर गांधी ह्यांनी पोलिसांच्या अटकेपासून बचाव करण्या साठी विद्यमान अतिरिक्त सत्र न्यायालय अकोट येथे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता.
अटकपूर्व जामीन मिळावी म्हणून विधितज्ञा ची फौज ही दोन्ही डॉक्टरांनी लावली होती परंतु तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे ह्यांनी पोलिसांची बाजू उत्तम पणे मांडल्याने विद्यमान अतिरिक्त सत्र न्यायधीश गणोरकर ह्यांनी दोन्ही बाजू ऐकून दोन्ही आरोपीची अटकपूर्व जामीन फेटाळून लावली, अकोट शहरातील सिटी हॉस्पिटल हे कोणतीही पूर्व परावनगी न घेता बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट चा भंग केला व आपल्या दवाखान्यात कोणतीही पडताळणी न करता स्वतः च्या आर्थिक फायद्या साठी बोगस डॉक्टर निखिल गांधी ह्याला बाह्य रुग्ण विभाग ताब्यात देऊन रुग्णांच्या जीविताशी खेळवाड केला असा आरोप पोलिसांनी लावून, डॉक्टर श्याम केला, डॉक्टर धनराज राठी व बोगस डॉक्टर निखिल गांधी ह्यांचे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला होता.
अकोट शहरातील नावाजलेल्या डॉक्टर केला व डॉक्टर राठी ह्यांचा अटक पूर्व जामीन अर्ज विद्यमान न्यायालयाने फेटाळल्याने एक प्रकारे पोलिसांच्या तपासावर शिकमोर्तबच केले, सदर प्रकरणात सरकारी वकील अजित देशमुख यांनी उत्तम रित्या बाजु मांडल्याने आरोपिंचा जामीन अर्ज रद्द झाला.आरोपींची अटकपूर्व जामीन रद्द झाल्याने त्यांचे अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
अधिक वाचा : निर्जन ठिकाणावरून ११ अल्पवयीन युवक-युवतींना पकडले,अकोट ग्रामीण पोलिसांची कारवाई
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola