अकोट (सारंग कराळे) – अकोटातील शाळा, महाविद्यालय, शिकवणी च्या नावाने घरातून बाहेर पडणाऱ्या काही विद्यार्थी पालकांची तसेच शिक्षकाची दिशाभूल करीत पोपटखेड परिसतील विशिष्ठ भागात युवक-युवती नेहमीच दिसून येतात.या प्रकाराची अनेक दिवसांपासून ओरड सुरू होती. या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष वेधून अकोट ग्रामीण पोलिसांनी ११ जणांना पकडले.
अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोपटखेड व परिसरातील काही भागात आंबट शौकीन जात असल्याची खात्रीलायक माहिती ठाणेदार मिलिंदकुमार बहाकर यांना मिळाली.ठाणेदार मिलींदकुमार बहाकर,पीएसआय अनुराधा पाटेखेडे व सहकार्यानी शनिवारी या परिसरात साध्या कपड्यात दुचाकीवरून या भागात गस्त सुरू केली. यावेळी त्यांना ५ अल्पवयीन मुली व ६ अल्पवयीन मुले दिसून आली.त्यांना विचारणा केली.
मात्र समाधानकारक उत्तरं न मिळाल्याने सर्वाना पोलीस स्टेशनला आणले.पोलिसांनी सर्वांच्या पालकांना बोलावून त्याच्या ताब्यात दिले.पालक पोलीस ठाण्यात आल्यानंतर अनेकांचे पितळ उघडे पडले, कारण काहींनी शिकवणी तर अनेकांनी विविध कारणे सांगून घराबाहेर प्रवेश केला होता.या पूर्वी पोपटखेड परिसतील निर्जन ठिकाणावर बलात्कार, खून असे गंभीर प्रकार घडले आहेत. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या कार्यवाहीचे सर्वत्र कौतूक होत आहे.
ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, ठाणेदार मिलींदकुमार बहाकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएसआय अनुराधा पाटेखेडे,हशमत पठाण,श्री कृष्ण गावंडे, सुनील फोकमारे,स्वप्नील सरोदे,राजू जोंधारकर,मोतीराम गोडचोवर, केशव मोंढे, पंजाबराव कराळे,महेश श्रीवास यांच्या महिला कर्मचारी यांनी केली.*
कोणतीही घटना घडण्याअगोदर आधीच खबरदारी घेतली तर अनेक गंभीर प्रकाराला आळा बसू शकतो, कोणालाही काही अनुचित प्रकार दिसून आला तर सजग नागरिक म्हणून पोलिसांना माहिती द्यावी आपले नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे आव्हान यांनी केली आहे.
अधिक वाचा : पिंप्री जैनपुरचा २० वर्षाचा युवक झाला तंटामुक्ती अध्यक्ष
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola