मुंबई- महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात आता बदल करण्यात आला असून त्यानुसार थेट निवडून आलेल्या सरपंचांची मुदत एक वर्षाने वाढून ती सहा वर्षे होणार आहे. जनतेतून थेट निवडून आलेल्या सरपंचांचा कार्यकाल पाच वर्षांऐवजी आता सहा वर्षे करण्यात आला आहे.
प्रकरण १८ अधिनियम कलम ४९ पोटकलम (४) नुसार जनतेतून थेट निवडून आलेले सरपंच ग्रामपंचायतीच्या सर्व समित्या तसेच पोटसमित्यांचे पदसिद्ध अध्यक्ष राहतील आणि ग्रामसेवक त्या समित्यांचे सचिव म्हणून काम पाहतील, हा बदल महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आला आहे. या बदलाची अंमलबजावणी संबंधित ग्रामपंचायतींना बंधनकारक राहणार आहे. सरपंचांचा कार्यकाळ पाचवरून सहा वर्षे करण्यात आल्याने नव्यानेच निवडून आलेल्या सरपंचांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी सर्व समित्यांच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पेलताना सरपंचांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
अधिक वाचा : सी.सी.टी.एन.एस. प्रणालीच्या प्रभावी वापरातून राज्यातील कायदा, सुव्यवस्था सक्षम करा – मुख्यमंत्री
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola