• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

सामाजिक जबाबदारी समजुन जलसंवर्धन आवश्यक

Team OurAkola by Team OurAkola
May 20, 2020
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
अकोला
11
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला, दि. 29:- जल व्यवस्थापन हा महत्वाचा विषय असून जलपुर्नभरण ही प्रक्रिया करणे काळाची गरज आहे. सर्वांनी सामाजिक जबाबदारी समजुन जलसंवर्धन करणे आवश्यक असल्याचे मत यावेळी चर्चेत सहभागी वक्त्यांनी केले.

आज 29 ऑगस्ट 2018 रोजी भुजल नियमांचे स्वरूप सर्वसामान्य नागरिकांना पटवून देण्यासाठी महाराष्ट्र भुजल (विकास व व्यवस्थापन) नियम 2018 चा मसुदा नियमावलीच्या अधिसुचना संदर्भात हरकती/सुचना कळविण्याबाबत जनजागृती कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनात करण्यात आले होते.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

या कार्यशाळेत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई वाघोडे, महापौर विजय अग्रवाल, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय ,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जमील पठाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, भुजल सर्वेक्षण विभागाचे उपसंचालक संजय कराड, वरिष्ठ भुवैज्ञानिक रविंद्र शेलार , अपर जिल्हाधिकारी राजेश खवले, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, सहायक भुवैज्ञानिक अधिकारी प्रविण बरडे, पोलीस उपअधिक्षक श्री. गावीत यांची प्रमुख उपस्थिती होती.

भविष्यात शुध्द भुजल साठा उपलब्ध होण्यासाठी आतापासूनच जलव्यवस्थापन व पुर्नभरण करणे आवश्यक असून नागरीकांनी संपत्ती साठविण्यापेक्षा पाण्याचा साठा साठविणे आवश्यक असून ग्रामीण भागात गुणवत्ता पुर्वक शुध्द पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे. असे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई वाघोडे यांनी व्यक्त केले.

शासनाने जलयुक्त शिवार, पाणलोट व्यवस्थापन ,वॉटरकप यासारख्या जलसंधरणाच्या योजना सुरू केल्या आहे. या माध्यमातून पाणी अडविणे , पाणी जिरवणे, यासारख्या जलसंधारणाची कामे करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश भारसाकळे यांनी केले.

पाणी पुर्नभरणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून सामान्य नागरीकांपर्यंत जनजागृती व्हावी शुध्द पाणी रिचार्ज व्हावे भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाणी पुर्नभरण करणे आवश्यक असल्याचे मत महापौर अग्रवाल यांनी व्यक्त केले.

पाणी पुर्नभरण्याच्या कामात तसेच महाराष्ट्र भुजल नियम 2018 चे उल्लंघन करणा-या व्यक्तींवर कठोर कार्यवाही करण्याचे प्राविधान मसुदा मध्ये असावे अशी सुचना जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी केली.

महसुल विभागाचे भुजल संवर्धनाबाबत कायदे आहेत. त्या कायदयांची सांगड घालून मसुदा व नियम तयार करण्यात यावे अशी सुचना अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केली. भुजल अधिनियम मसुदयाच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा भुजल सर्वेक्षण विभागानी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे दयावी अशी सुचना उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी केली.

भुजल सर्वेक्षण विभागाचे उपसंचालक संजय कराड यांनी मसुदा नियमावली विषयी सादरीकरण केले. राज्य भुजल प्राधीकरण म्हणून महाराष्ट्र जल संपत्ती नियमन प्राधीकरण काम करणार असून पाण्याच्या गुणवत्तेचे संरक्षण केले जाईल. तसेच राज्यातील अधिसुचित आणि अनअधिसुचित क्षेत्रातील सर्व अस्तित्वातील विहीरांचे , विहिर मालकांची नोंदणी करण्यात येईल. जिल्हा प्राधिकरणाच्या पुर्व परवाणगी शिवाय अधिसुचित क्षेत्रातील भुजलाची विक्री करता येणार नाही. राज्यातील सर्व विधंन यंत्र मालकांना त्यांच्या मालकीच्या विधंन विहीराचे खोदकाम यंत्राची नोंदणी करून घ्यावी लागेल. अशी माहिती भुजल सर्वेक्षण विभागाचे उपसंचालक संजय कराड यांनी दिली.

वरिष्ठ भुवैज्ञानिक रविंद्र शेलार यांनी महाराष्ट्र भुजल (विकास व्यवस्थापन ) नियम 2018 चा सविस्तर मसुदा दि. 25 जुलै 2018 रोजी महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरी कोणत्याही व्यक्तीस हरकती वा सुचना शासनास पाठवावयाच्या असल्यास मा. अपर मुख्य सचिव, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, सातवा मजला, गोकुळदासतेजपाल रूग्णालय इमारत संकुल, का्रॉफर्ड मार्केट जवळ, लोकमान्य टिळक मार्ग, मुंबई-1 यांचेकडे 31 ऑगष्ट 2018 पर्यंत लेखी स्वरूपात अथवा [email protected] या ई-मेलवर पाठविण्यात याव्यात. या दिनांका पर्यंत प्राप्त होणा-या हरकती/सुचना शासन विचारात घेणार आहे, असे प्रास्ताविकातुन सांगितले.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व जलपुजन करून कार्यशाळेची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन अमरावती येथील सहायक भुवैज्ञानिक हेमा जोशी यांनी केले. उपस्थितांचे आभार सहायक भुवैज्ञानिक प्रविण बरडे यांनी मानले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सदस्य , सरपंच , शेतकरी , ग्रामस्थ, अधिकारी उपस्थित होते.

अधिक वाचा : अडगाव बु येथे शेतकरी संघटना ची सभा संपन्न, शेती व्यवसाय मधील शासकीय हस्तक्षेप कमी करावा – ललित दादा बहाळे

अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.

अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia

अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks

अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola

अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola

Previous Post

भांबेरी तंटामुक्ती अध्यक्ष पदी भारत भिमराव बोदडे ह्यांची निवड

Next Post

चिखलगावच्या ग्रामस्थांनी केरळ पुरग्रस्तांसाठी दिला भरीव निधी

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Next Post
अकोला

चिखलगावच्या ग्रामस्थांनी केरळ पुरग्रस्तांसाठी दिला भरीव निधी

दुभाजक सौन्दरीकरणासाठी युवा कोळी महासंघाचा पुढाकार

दुभाजक सौन्दरीकरणासाठी युवा कोळी महासंघाचा पुढाकार

आपली प्रतिक्रियाCancel reply

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.