जकार्ता : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची धावपटू दुती चंद हिने १०० मीटरमध्ये रौप्य जिंकल्यानंतर तिने २०० मीटर स्पर्धेतही रौप्य पदक मिळवले.
२२ वर्षाची दुती चंद ही ओडिशातील चकगोपाल येथील रहिवाशी आहे. वयाच्या चौध्या वर्षी तिने धावण्याचा सराव सुरू केला आणि आज तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन पथके जिंकली आहे. दुती हिची मोठी बहीण सरस्वती चंद ही अॅथलेटिक्स खेळाडू आहे. तिची प्रेरणा घेत दुतीने अॅथलेटिक्समध्ये करिअर घडविले.
तिने २०० मीटर स्पर्धेत २३.२० सेकंद इतकी वेळ नोंदविली. या स्पर्धेत बहरीनची इडिडियॉन्ग हिने २२.९६ सेकंद वेळ नोंदवत सुवर्ण जिंकले. तर चीनची योंगली वेई हिने २३.२७ सेकंद वेळ नोंदवत कांस्य पदक जिंकले.
अधिक वाचा : Asian Games 2018 : पी. व्ही. सिंधू ला रौप्यपदक
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola