अकोला : मराठा समाजाच्या विदयार्थ्यांसाठी आर्थिक, शैक्षणिक सवलती व विविध योजनांबाबत गुरुवार, दि. 30 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण असणाऱ्या या कार्यशाळेस मोठया संख्येने विदयार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने आयोजित या कार्यशाळेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आणि डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना यांची माहिती देण्यात येणार आहे.
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विदयार्थी केवळ निधी अभावी अभ्यासक्रमापासुन वंचित राहु नये म्हणून एक सामाजिक बांधिलकी व घटनात्मक उत्तरदायीत्व निभावणारे धोरणात्मक निर्णय महाराष्ट्र शासनाने मागील काही दिवसात घेतले आहे. हे निर्णय विदयार्थी व संस्थांपर्यंत पोहोचवून त्यांचा प्रत्यक्ष लाभ त्यांना मिळावा यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, त्यामुळे जास्तीत जास्त विदयार्थी व संस्था प्रमुखांनी या कार्यशाळेस उपस्थित राहून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले आहे.
हेही वाचा : केरळ पुरग्रस्तांसाठी ई-रिक्शा महिलाचालकानी दिली रक्षाबंधनाची ओवाळणी
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola