अकोला: सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून सामाजिक कार्यात सदोदित अग्रेसर राहणाऱ्या अकोला येथील म रा वि म अभियंता सहकारी पतसंस्था मर्यादित अकोलाकडून कावड यात्रेमध्ये अपघाती मरण आलेल्या संतोष हजारे यांच्या तिन्ही मुली व पत्नीला दरमहा २ हजार रुपये तीन वर्षांपर्यंत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष खुमकर, पोलिस बॉईज असोसिएशनच्या विदर्भ अध्यक्षा अॅड. रुपाली राऊत, नगरसेविका तुळसाबाई गाडगे, सेनेचे उपतालुका प्रमुख सागर रामेकर, संदीप गाडगे आदींची उपस्थिती होती.
यापूर्वीही सदर पतसंस्था अनेक गरजवंतांच्या मदतीला धावून गेली आहे. त्यामध्ये काही दिवसांपूर्वी विवरा विषबाधा झालेल्या युवकाच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्याला उपचारासाठी एमएसइबी अभियंता सहकारी पतसंस्था, अकोला व सब ऑर्डीनेट इंजिनिअर्स असोसिएशनच्यावतीने पाच हजार रुपयांची मदत करण्यात आली होती. यासंदर्भात पोलिस बॉईज असोसिएशनच्या विदर्भ प्रमुख अॅड. रुपाली राऊत यांनी संस्थेकडे सामाजिक बांधिलकी म्हणून मदत करण्याची विनंती केली होती. त्यांच्या विनंतीवरुन सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाNया या पतसंस्थेचे चेअरमन संतोष खुमकर यांनी या युवकाच्या उपचारासाठी पाच हजार रुपयांचा धनादेश दिला.
रविवार दिनांक ५ ऑगस्ट २०१८ रोजी विवरा (पातूर) येथील वैभव सहदेव पजई (२७) हे शेतात फवारणी करीत असतांना त्यांना विषबाधा झाला होतीr. त्यांना अकोला येथील डॉ. रणजित कोरडे यांच्याकडे भरती करून उपचार करण्यात आले. वैभव पजई यांची घरची परिस्थिती खूपच हलाखीची आहे. त्याच्या उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याने सदर संस्थेकडे आर्थिक मदतीची मागणी करण्यात आली होती. सदर संस्था सामाजिक कार्यात नेहमीच आघाडीवर असते. गेल्या महिन्यात दिवसांपूर्वी पावसामुळे पातूरातील एका घरावर दगड कोसळून गरीब कुटुंबातील लोक जखमी झाले होते. त्यावेळीही या संस्थेने त्यांना सामाजिक बांधिलकीमधून २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती, तसेच पातूर मधील दरड कोसळून जखमी ना सुध्दा 20 हजाराची मदत करण्यात आली होती हे विशेष उल्लेखनीय!
अधिक वाचा : टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिणीच्या LIVE कार्यक्रमात पत्रकारांला धक्काबुक्की
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola