अकोट(सारंग कराळे)- अकोट तालुक्यातील ग्राम पिंप्रि खुर्द-पिंप्री जैनपुर गटग्राम पंचायत मार्फत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेमध्ये एका वीस वर्षाच्या युवकावर गावाच्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या तंटामुक्ती अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.
एकीकडे तंटामुक्ती अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी तंटे होत असतात पण पिंप्री खुर्द-पिंप्री जैनपुर मधील ग्रामस्थांनी एक वेगळा आदर्श जोपासत सर्वानुमते तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर परशराम मानकर(२०) वर्षाच्या युवकाची अविरोध निवड करण्यात आली.विशेष म्हणजे ही निवड बिनविरोध झाली. गावकऱ्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असे यावेळी तरुण तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानेश्वर मानकर यांनी सभेत आश्वासन दिले.यावेळी निवडीचे श्रेय जेष्ठ,पुरुष,तरुण युवक व पिंप्री खुर्द-पिंप्री जैनपुर गटग्रामपंचायतच्या समस्त ग्रामस्थांना त्यांनी दिले.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola