अमरावती येथे टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिणीच्या LIVE कार्यक्रमात एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांने राहुल झोरी या वृत्तवाहिणीच्या पत्रकारांला धक्काबुक्की करून मारहाण केली. या घटनेचा निषेध करीत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ अकोला जिल्ह्याचे वतीने जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष कुंदन जाधव,जिल्हाध्यक्ष संदीप पांडव, विशाल राजे बोरे,सिध्दार्थ तायडे,सिध्दार्थ कांबळे,गणेश सोनोने, निजाम साजिद,आसिफ अहमद खान, सुनील अवचार, अजय डांगे, यांचेसह जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.