अकोला(प्रतिनिधी)- अकोला पालिकेतील एका लाचखोरास १८०० रुपयांची लाच स्वीकारताना अकोला लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी रंगेहाथ अटक केली.
अकोला महानगर पालिकेतील आरोग्य निरीक्षक म्हणून कर्तव्यावर असलेल्या मंगेश किसन बांगर (३०) यास आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना अटक केली.यावेळी लाचखोर बांगर याने अकोला महानगर पालिकेत सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलेचे जुलै महिन्याचे ९ खाडे नियमित करण्याकरिता एक खाड्याचे २०० या प्रमाणे १८०० रुपयांची मागणी केली होती.
आज सकाळी बांगर हा लाचेची रक्कम स्वीकारताना अकोला लाच लुचपत विभागाने रंगेहाथ अटक केली.सदर कारवाई संजय गोर्ले पोलीस उप अधीक्षक,ईश्वर चव्हाण पोलीस निरीक्षक,पोहवा गजानन दामोदर ,सुनील राऊत,राहुल इंगळे,सुनील येलोने,कैलास खडसे यांनी केली.
अधिक वाचा : तेल्हारा तालुक्यातील थार येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola