अकोट(सारंग कराळे)- अमर रहे अमर रहे अटलजी अमर रहे जब तक सूरज चाँद रहेगा तब तक आपका नाम रहेगा.या जयघोष करीत सजवलेल्या रथावर पुष्पवृष्टी करत अकोटकरांनी अस्थीचे दर्शन घेतले २५ ऑगष्ट रोजी निंबा,तेल्हारा, हिवरखेड,अड़गाव मार्गे अकोट शहर व ग्रामीण च्या पदधिका-यांनी अड्गाव खुर्द फाट्यावरून भव्य मोटर सायकल रैलीने रात्री ८ वाजता शिवाजी चौकात अस्थिकलश यात्रेचे आगमण झाल्यानंतर सामुहिक श्रध्दांजलीचा कार्यक्रम पार पडला.
भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांच्या नेतृत्वातील अस्थिकलश रथयात्रेसोबत अकोट मतदार संघाचे आ.प्रकाश भारसाकळे यांच्या सह शहर व ग्रामीण भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते वाहनाच्या ताफासह अस्थिकलश रथयात्रेत सहभागी झाले होते. २५ ऑगष्ट रोजी दुपारी ५ वाजतापासुन शिवाजी चौकात उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये अकोट शहर व तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते अस्थिकलशा च्या दर्शना साठी वाट पहात होते.अस्थिकलश रथ यात्रेचे आगमण झाल्यानंतर शिवाजी चौकातील मंडपात कार्यकर्ते पत्रकार बांधव युवा महिला तसेच शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांनी अस्थिकलशाचे दर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली.माजी पंतप्रधान भारतरत्न लोकप्रिय वक्ते कवी, कर्तव्यदक्ष राज्यकर्ते आणि आणखीही बरेच काही अशी चौफेर भुमिका समर्थपणे वठवत असतांना भारतीय जनमानसावर कायमची छाप सोडुन जाणार्या अटलजींना त्यांच्या समर्थकांसह राजकीय विरोधकांनीही मनापासुन श्रध्दांजली वाहिली असल्याचे मत आ प्रकाश भारसाकळे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा : भारतरत्न श्रद्येय अटलबिहारी बाजपेयी यांचे अस्थी कलशाचे हिवरखेड वासीयानी घेतले श्रद्धापूर्वक दर्शन
यावेळी भाजपा अकोट शहर अध्य्क्ष कनक कोटक, ग्रामीण अध्य्क्ष राजेश रावणकर,बाळासाहेब आसरकर, जिल्हा संपर्क प्रमुख राजेश नागमते,नगराध्यक्ष हरिनारायण माकोडे,उपाध्य्क्ष अबरार खाँ,जयप्रकाश पांडे, बाळासाहेब भांडे,माजी नगराध्यक्ष पुरूषोत्तम चौखंडे,अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष शेरुदीन पंचगव्हाणकर,संतोष झुनझुनवाला,मंगेश लोणकर,हरीष टावरी,एड मोहन आसरकर,डॉ गजानन महाल्ले,मधुकर बोडखे,संतोष राठौर,बद्रोद्दीन अहेमद खान,मुश्ताक पटेल, सै इमरान अली,इकबाल इनामदार,कालू भाई,जाकीर शाह,पुराडउपाधे,विवेक धुळे,शिवदास तेलगोटे,जितु जेस्वानी,श्रीकृष्ण वावगे,मतीन पटेल,लतीफ खाँ,असलम पटेल,राजेश पाचडे,सुनील गिरी,प्रवीण डिक्कर,बाळू घावट,राजेश शेळके,अनिरुध्द देशपांडे,विक्रम ठाकुर,एड अतुल सोनखासकर,मनोज चंदन,विलास बोडख, कु चंचल पिताम्बरवाले,कुसुमाताई भगत,दिपाली केवटी, बोंडे ताई,सौ अंकिता ताडे,विजय जवंजाळ,मयूर आसरकर,उमेश बहाकर,दीपक मुंडोकार,जयदेवराव साबळे,नितिन टोलमाऱे,विजय बुंदिले,मंगेश गौर,विष्णु बोडखे यांचेसह अकोट शहर व तालुक्याचे पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संखेने उपस्थित राहून अटलजींचे अस्थिचे दर्शन घेतले
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola