अकोट(सारंग कराळे)- अकोट शहरात गाजत असलेल्या बोगस डॉक्टर निखिल गांधी प्रकरणात आणखी एका डॉक्टरवर अकोट शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने अकोट शहरातील वैद्यकीय क्षेत्रात पुन्हा खळबळ उडाली असून प्रथम डॉक्टर जपसरे,त्यानंतर बोगस डॉक्टर निखिल गांधी , डॉक्टर श्याम केला व आता डॉक्टर डी एच राठी अश्या वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांवर गुन्हे दाखल झाल्याने अकोट शहरातीलवैद्यकीय क्षेत्र ढवळून निघत आहे, सदर प्रकरणाची हकीकत अशी की स्थानिक बस स्थानका समोरील सिटी हॉस्पिटल हे अधिकृत नोंदणी न करता अनधिकृत पणे सुरू असल्याचे तक्रारी वरून जिल्हा शल्य चिकित्सक अकोला ह्यांनी अकोट ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संजय कोलते ह्यांचे नेतृत्वात एक तपासणी पथकाचे गठन करून त्यांना सिटी हॉस्पिटल अकोट ह्याची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते ,त्या अनुषंगाने सदर तपासणी पथकाने तपासणी केली असता सिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची तपासणी सुरू असल्याचे आढळून आले.
परंतु सदर हॉस्पिटलमध्ये रुग्ण सेवा सुरू करण्या पूर्वी बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट नुसार नोंदणी आवश्यक असूनही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली नसतानाही रुग्णांवर उपचार व इतर वैद्यकीय सेवा देणे सुरू असल्याचे आढळून आले तसेच निखिल गांधी हे हॉस्पिटलचा बाह्य रुग्ण विभाग सांभाळत असल्याचे आढळून आल्याने त्याचे विषयी नोंदणी फॉर्म मध्ये कुठलाही उल्लेख नसल्याने त्याचे कडे वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय वयवसायचा परवाना मागितला असता त्याने थोड्या वेळात आणून देतो असे सांगून पलायन केले , ह्या बाबत चा अहवाल जिल्हा शल्य चिकित्सकांना प्राप्त होऊनही पोलिसात तक्रार न झाल्याने काही पत्रकार व नागरिकांनी ह्या बाबत विचारणा सुद्धा केली होती, दरम्यान डॉक्टर श्याम केला ह्यांनी पोलिस स्टेशन अकोट शहर येथे एक महिन्या पूर्वी निखिल गांधी ह्यांचे विरुद्ध डॉक्टर असल्याचे भासवून कोणतेही वैध वैद्यकीय शिक्षण व परवाना नसतांनाही त्यांचे हॉस्पिटल मध्ये रुग्ण तपासणी केली व डॉक्टर केला ह्यांची फसवणूक केल्याची तक्रार केल्याने पोलिस स्टेशन अकोट शहर येथे निखिल गांधी ह्यांचे विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान तपासा मध्ये डॉक्टर श्याम केला ह्यांनी स्वतः चा बचाव करण्या साठी जाणीव पूर्वक तक्रार दिल्याचे तसेच तपासणी पथक प्रमुख डॉक्टर संजय कोलते ह्यांनी दिलेल्या तक्रारींचे अनुषंगाने डॉक्टर श्याम केला ह्यांना सुद्धा आरोपी करण्यात आले होते, सदर हाय प्रोफाईल प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असतांना तपासा दरम्यान ह्या मध्ये डॉक्टर डी एच राठी ह्यांचा सुद्धा सहभाग दिसून आल्याने नमूद गुन्ह्यात त्यांना सुद्धा आरोपी करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली, सद्य स्थिती मध्ये सिटी हॉस्पिटल बंद असून डॉक्टर श्याम केला व डॉक्टर डी एच राठी हे दोघेही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत , विशेष बाब ही की बोगस डॉक्टर निखिल गांधी ह्याने अकोट च्या सत्र न्यायालया तुन अटकपूर्व जामीन आणली होती पण तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे ह्यांनी पोलिसांची बाजू सक्षम पणे मांडल्याने न्यायालया ने अकोट शहर पोलिसांचा तपास ग्राह्य धरून निखिल गांधी ह्याचा अटकपूर्व जामीन रद्द केला, हा एक प्रकारे अकोट शहर पोलिसांनी केलेल्या पारदर्शक तपासा चे यशच म्हणता येईल, नमूद हाय प्रोफाइल तपासा मध्ये अकोट पोलिसांनी कोणत्याही दबावाला व प्रलोभणाला बळी न पडता पारदर्शक तपास करून डॉक्टर राठी ह्यांचेवर गुन्हा दाखल केला,नमूद गुन्ह्याच्या तपासा मध्ये वेळो वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी व विधी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेण्यात आले, नमूद गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनिल सोनवणे ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन शेळके, पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे हे करीत आहेत.
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – https://twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola