अकोट (सारंग कराळे) – अकोट शहरातील अवैध धंदेवाल्याविरुद्ध ठाणेदार गजानन शेळके यांनी कारवायांचा सपाटा लावला असून गेल्या काही दिवसांपासून कारवायांवर कारवाया होत असताना दिसून येते.
आज शहर पोलीसाना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन लक्कडगंज आशियाना बार समोरील पुष्पक हॉटेल जवळ सार्वजनिक ठिकाणी वरली मटक्याचे आकड्यावर पैशाचे हारजितचा जुगार खेळतांना 1) दिपक विश्वनाथ हरणे रा सरस्वती नगर 2)सुरेश नारायण सुगंधी रा बळीराम चौक अकोट 3) सलीम बेग तवक्कल बेग रा पोपटखेड हे मिळून आले त्यांचे जवळून जुगार साहित्य व नगदी 4150/-रुपये जप्त केले व पो नि सा यांनी गुन्हा दाखल केला तसेच आठवडी बाजार अकोट येथे रेड केली असता 1) अशोक चंपालाल चांडक रा देवरी 2) प्रवीण प्रभूदास कोटक रा केशवराज वेटाळ अकोट 3) सुनील रामनारायन मंत्री रा गांधी मैदान अकोट 4 ) दिलीप वसंत शेंडे रा नंदीपेठ अकोट हे मिळुन आले त्याचे कडुन जुगार साहित्य व नगदी 3740/- रुपये मिळुन आले तसेच ड्रिंमलँड हॉटेल समोरील खुल्या जागेत रेट केली असता 1 ) राजु नारायण वगारे रा शनिवारा अकोट 2) सत्यपाल रामाजी गवई रा अडगाव खुर्द ता अकोट हे मिळुन आले त्यांचे जवळुन जुगार साहित्य व नगदी 700/- रुपये चा माल जप्त केला तसेच यापूर्वी दि 21 व 22/08/18 रोजी श्रीनिवास सिनेमागृहा जवळ जुगार रेड केली असता निलेश दादाराव तेलगोटे रा सोमवारवेस अकोट हा वरली मटक्याचे आकड्यावर पैशाचे हारजितवर जुगार खेळताना मिळुन आला त्याचे जवलून जुगार साहित्य व नगदी 510/- रुपये जप्त केले तसेच पटेल कॉम्प्लेक्स समोर अकोट येथे प्रोव्ही रेड केला असता दिपक गोपीचंद सुडेवाल रा दक्खनी फाईल हा अवैध रित्या विनापरवाना देशी दारूची विक्री करतांना मिळून आला त्याचे जवळुन देशी दारुचे 20 क्वार्टर किंमत 1200/- रू चे जप्त केले आहे सदरची कारवाही मा पो नि गजानन शेळके सा सपोनि ज्ञानोबा फड पोउपनी महेंद्र गवई पोहेका संजय घायल राकेश राठी अणिल भातखंडे, सुलतान पठाण विजय सोळंके जवरीलाल जाधव यांनी केली आहे.