तेल्हारा(शुभम सोनटक्के)- अकोला जिल्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत थार येथे स्मशानभूमी नसल्याने येथील नागरीकांना मयत झाल्यास अंत्यविधीसाठी थेट तालुक्याचे ठिकाण गाठावे लागत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
तेल्हारा तालुक्यातील ग्राम थार येथे स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.ग्राम थार येथे स्मशानभूमी नसल्याने येथील नागरिकांना तालुक्याचे ठिकाण गाठून अंत्यविधी करावा लागतो.जिल्हा प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा जिल्हा प्रशासन ग्राम पंचायत च्या पाठपुराव्याला केराची टोपलि दाखवत आहे.गेल्या चार वर्षांपासून ग्राम पंचायत प्रशासन जिल्हा प्रशासनाकडे स्मशानभूमी संदर्भात पाठपुरावा करीत आहे मात्र जिल्हा प्रशासन ठेंगा दाखवत आहे.त्यामुळे येथील नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड बसत असून मयताची सुद्धा हेळसांड होते.नागरिकांना नाहक दुचाकी चारचाकी घेऊन पाच किलोमीटर अंतरावर अंत्यविधी साठी जावे लागत आहे.अकोला जिल्यातील प्रशासन ग्राम पंचायत प्रशासनाला सोई सुविधा पुरविण्यास किती तत्पर आहे हे ग्राम थार येथील स्मशानभूमी च्या प्रकरणावरून लक्षात येते.
हेही वाचा : अटकळी येथे तंटामुक्ती अध्यक्षपदी रमेशभाऊ जामाजी दारोकार ह्यांची बिनविरोध निवड
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola