अकाेला- जिल्ह्यातील ग्रामीण व नागरी भागातील पाणी टंचाई निवारण्यासाठी शासनाने एेन पावसाळ्यात ११ काेटी ७८ लाखाचा निधी मंजूर केला अाहे. अकाेला तालुका, महानगर पालिका, मूर्तिजापूर शहर आणि बार्शीटाकळी नगर पंचायत क्षेत्रातील पाणी टंचाईच्या कामासाठी हा निधी मंजूर करण्यात अाला अाहे. सर्वाधिक निधी ग्रामीण भागातील उपाय योजनांसाठी मंजूर झाला अाहे. याबाबतचा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने गुरुवारी १६ अाॅगस्ट राेजी जारी केला अाहे.
जिल्ह्यातील पाणी टंचाई निवारण्याची कामे बाराही महिने सुरु असतात. काेट्यवधी रुपयांचा खर्च केल्यानंतरही प्रादेशिक पाणी पुरवठा याेजना प्रभावीपणे कार्यान्वित राहत नाही. ६४ खेडी पाणी पुरवठा योजनेचीही स्थिती अशीच अाहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत ग्रामस्थांना नियमित पाणी पुरवठ्यासाठी अामदार रणधीर सावरकर यांनी शासनाकडे निधीची मागणी केली हाेती.
राज्य शासनाकडून या कामांसाठी निधी मंजूर
१) खांबाेरा ६४ खेडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील ४४ गावांना पाणी पुरवठा व्हावा, यासाठी १ काेटी ८४ लाख रुपये मंजूर करण्यात अाले अाहेत.
२) काटेपूर्णा प्रकल्प ते खांबाेरा उन्नई बंधाऱ्यापर्यंत पाइप लाईन टाकण्यासाठी विशेष बाब म्हणून ४ काेटी ७१ लाख ४२ हजार रुपये मंजूर केले गेले.
३) मूर्तिजापूर शहरातील पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ३ काेटी २५ लाखाचा निधी मंजूर करण्यात अाला अाहे.
४) बार्शीटाकळी नगरपंचायतीच्या तात्पुरत्या पूरक नळ पाणी पुरवठा योजनेसाठी २२ लाख रुपयांच्या िनधीला मंजुरी देण्यात अाली अाहे.
५) महापालिका क्षेत्रातील पाणी टंचाई उपाय योजनांसाठी १ काेटी ७४ लाख रुपये मंजूर करण्यात अाले.
अकाेला जिल्ह्यात सन २००४मध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली हाेती. त्या वेळी अकाेला शहरातील पाणी पुरवठा करणाऱ्या महान येथील काटेपूर्णा प्रकल्प जवळपास काेरडाच पडला हाेता. त्यामुळे तेल्हारा तालुक्यातील वान धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला हाेता. यासाठी वान ते अकाेला अशी जलवाहिनी टाकण्यात अाली. तेव्हापासून मात्र अकाेल्याला वान येथील हनुमान सागर प्रकल्पामधून पाणी पुरवठा करण्याची वेळ अाली नाही. मात्र तेव्हा टाकण्यात अालेल्या जलवाहिनीचा अाता ६४ खेडी पाणी पुरवठा योजनेसाठी उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात अाला हाेता. यासाठी पैसाही खर्च करण्यात अाला. मात्र सर्वच ठिकाणी पाणी पाेहाेचले नाही. त्यामुळे अाता नव्याने मंजूर झालेल्या निधीतून तरी सर्वच ग्रामस्थांपर्यंत पाणी पाेहाेचेल, याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांमधून व्यक्त हाेत अाहे.
निधी खर्च करण्यासाठी शासनाने अटी व शर्तीही घालून दिल्या अाहेत. यात सन २०१७-१८ या कालावधीत झालेल्या कामांचे देयके अदा करणे, अन्य टंचाई कालावधीतील उपाय याेजनांसाठी खर्च न करणे, १०० टक्के काम पूर्ण झाल्याची खातर जमा झाल्याशिवाय निधी वितरीत करण्यात येऊ नये, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे (मजीप्रा) राबवण्यात येणाऱ्या योजनांचा निधी िज.प.ला हस्तांतरित न करता मजीप्राला हस्तांतरित करावा अादींचा समावेश अाहे.
हेही वाचा : भारिप नेते आसिफ खान यांचा खुना प्रकरणी ZP महिला सदस्यला अटक, मृतदेह फेकला पूर्णा नदीत
अकोला शी संबंधित सर्व बातम्यांसाठी आम्हाला फेसबुक, ट्विटर, यूट्यूब वर फॉलो करा.
अवर अकोला ला फेसबुक वर लाईक करा – www.facebook.com/OurAkolaMedia
अवर अकोला’च्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा – www.youtube.com/OurMediaNetworks
अवर अकोला ला ट्विटरवर फॉलो करा – www.twitter.com/ourakola
अवर अकोला ला इन्स्टाग्रामवर फॉलो करा – www.instagram.com/OurAkola