तेल्हारा (प्रतिनिधी)- येथील संत रविदास समाज मंदिराची दयनीय अवस्थेबाबत चर्मकार समाज तेल्हारा यांच्या वतीने दि.18/08/2018 रोजी निवेदन देण्यात आले .
तेल्हारा शहरातील संत रविदास समाज मंदिराची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून या समाज मंदिराला सभागृहाचे स्वरूप न राहता तेथे गुरे ,ढोरे,व अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या कडे न.प.या कडे दुर्लक्ष करत आहे त्या बाबत चर्मकार समाज यांच्या वतीने नगर परिषद यांना निवेदन देऊन समाज मंदिराची दुरावस्थे बाबत न.प.मुख्यधिकारी साहेब यांचीशी चर्चा करण्यात आली.
संत रविदास महाराज समाज मंदिर सभागृह हे शहरातील अनेक समाजिक उपक्रम व कार्यक्रम करण्याकरिता निर्माण करन्यात आले आहे याच सभागृहात आज पर्यंत याच अनेक गोरगरीब लोकांचे विविध कार्यक्रम झाले असून पण आज या समाज मंदिराची अवस्था अत्यंत हलाखीची झाली आहे ,घाण ,मोकाट जनावरे , यांचे वास्तव आहे.त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा त्याच बरोबर समाज मंदिर इमारतीची दुरुस्ती करून त्या मध्ये सर्व सुविधा निशी तायर करण्यात यावे अश्या विविध बाबींचा समावेश निवेदना मध्ये करण्यात आला आहे .यावेळी माजी तालुका अध्यक्ष चर्मकार संघ गजानन रेवस्कर ,वासुदेवराव नासाने सचिनथाटे,सुरेशसिसोदिया,संजय मस्तुद,अशोक पानझाडे, महादेव गायकवाड,रामकृष्ण भटकर ,ज्ञानेश्वर माठे ,कमलेश बायड ,सुरेश सोनोने,कांशीराम सृयवांशी ,अशोक गव्हाळे,सखाराम क्षीरसागर, स्वनिल शेवाळे अशोक डामरे,कुणाल आमले,गणेश काकडे,विठ्ठल चव्हाण ,गोविंद चव्हाण, आकाश पवार, राजेश गणगे आदि यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.