अकोट ( सारंग कराळे) अकोट शहर पोलीस स्टेशन मधील दोन डी.बी पथक कार्यरत आहेत पैकी एका पथकाला सातपुड्यातील ओली पार्टी चागंलीच भोवली असुन अकोट शहरातील गंभीर स्वंरुपातील,गुन्हाचे आरोपी घरफोड्याचा तपास, निगरानी व सराईत गुन्हेंगारवर लक्ष ठेवुन कारवाई करण्याकरीता शहरातील सुरंक्षितेच्या दुष्टीने डी .बी.पथक कार्यरत केले असताना एका पथकावर वारंवार आरोप होत होते तसेच त्याच्याबाबत तक्रारीसुद्धा येत होत्या .यात भर पडली काही दिवसापुर्वी सातपुड्यात ओली पार्टी केली. या पार्टीचे काही फोटो वायरल झाल्यामुळे यातील काही फोटो डीपीडीसीच्या मिटीग मधे वरीष्ठ अधिकारी यांना दाखवण्यात आल्याची माहीती आहे त्यानतंर लगेच अकोट शहर पोलीस निरीक्षक यांनी एका डी बी पथकाला बरखास्त केलेे. त्या प्रकरणी वरीष्ठांनी चौकशीचे आदेश दिले व आज अखेर चौकशी अंती गैरवर्तुणुक केल्याबदल अकोट शहर पोलीस स्टेशनच्या 3 पोलीसाना निलंबित केल्याची विंश्वसनिय सुञांची माहीती आहे.