अकोट(सारंग कराळे)- अकोट शहरा मधील वैद्यकीय व्यावसायिकांवर दाखल होत असलेल्या सतत च्या गुन्ह्या मुळे अकोट शहरातील वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून प्रथम डॉक्टर जपसरे, त्या नंतर बोगस डॉक्टर निखिल गांधी, व आता अकोट शहरातील प्रसिद्ध डॉक्टर श्याम केला ह्यांचेवर गुन्हा दाखल झाल्याने वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे, प्राप्त माहिती नुसार अकोट शहरातील प्रसिद्ध त्वचा विकार तज्ञ डॉक्टर श्याम केला, डॉक्टर राठी ह्यांनी काही महिन्या पूर्वी स्थानिक बस स्थानका समोर सिटी हॉस्पिटल नावाचे मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले होते ,परंतु सदर हॉस्पिटल चे बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट प्रमाणे नोंदणी झाली नसल्याची तक्रार अकोटातीलच काही लोकांनी केली होती म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक ह्यांनी अकोट ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय कोलते ह्यांचे नेतृत्वात एक पथक तपासणी साठी पाठविले असता त्यांना सिटी हॉस्पिटलची कोणतीही नोंदणी झाली नसूनही तेथे रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आढळून आले, तसेच तेथे डॉक्टर निखिल गांधी नावाचे डॉक्टर बाह्य रुग्ण विभाग सांभाळत असल्याचे दिसून आले, त्याला त्याचे वैध वैद्यकीय परवाना व शैक्षणिक प्रमाणपत्र पथकाने मागितले असता त्याने आणून देतो असे सांगून गेला तो परत न आल्याने तपासणी पथकाने ह्या बाबत जिल्हा शल्य चिकित्सकांना अहवाल पाठवून डॉक्टर केला ह्यांना हॉस्पिटल बंद करण्यास सांगण्यात आले होते, परंतु ह्या प्रकरणी पोलिसां मध्ये तपासणी पथकाने तक्रार न दिल्या मुळे काही अकोटवासी व पत्रकारांनी सदर प्रकरण उचलून धरले होते, दरम्यान डॉक्टर केला ह्यांनी 1 महिन्या पूर्वी पोलिस स्टेशन अकोट शहर येथे बोगस डॉक्टर निखिल गांधी ह्यांचे विरुद्ध त्याने स्वतः ला डॉक्टर असल्याचे भासवून फसवणूक केल्याची तक्रार दिल्या वरून पोलिसांनी बोगस डॉक्टर निखिल गांधी विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.
अधिक वाचा: डॉक्टर ची पदवी नसलेला स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणारा डॉक्टर अकोट शहर पोलिसांच्या जाळ्यात
तपास सुरू असतानाच दिनांक 16/8/18 रोजी तपास पथकाचे प्रमुख व अकोट ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय कोलते ह्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक ह्यांचे लेखी परवानगीने पोलिस स्टेशन अकोट शहर येथे तक्रार अर्ज दाखल केला की तपास पथकाने डॉक्टर केला व डॉक्टर राठीह्यांचे सिटी हॉस्पिटलची तपासणी केली असता त्यांचे हॉस्पिटल ची बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट अंतर्गत कोणतीही नोंदणी न करता रुग्ण तपासणी सुरू होती व कोणतीही वैध वैद्यकीय परवाना व शैक्षणिक अहर्ता नसतानाही निखिल गांधी हा रुग्णांना तपासून त्यांचे वर उपचार करीत असल्याचे आढळून आल्याने डॉक्टर केला ह्यांनी स्वतः च्या आर्थिक फायद्या साठी निष्काळजी पणा करून निखिल गांधी ह्यांना आपल्या सिटी हॉस्पिटल चा बाहय रुग्ण विभाग रुग्णांवर उपचार करण्या साठी उपलब्ध करून देऊन रुग्णांच्या जीवाशी खेळ केला व बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट चा भंग केला ह्या तक्रारी वरून बोगस डॉक्टर निखिल गांधी ह्यांचे वर पूर्वीच दाखल गुन्ह्या मध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील सोनवणे, पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली डॉक्टर केला ह्यांना सुद्धा आरोपी करून त्यांचे विरुद्ध कलम 336 IPC व बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट चे कलम 3 व 6 अन्वये वाढ करून तसाअहवाल कोर्टाला व वरिष्ठांना पाठविण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक गजानन शेळके ह्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक आशिष शिंदे करीत आहेत.
बघा व्हिडिओ: